Yuvi Retires, Chaddha Hires...! क्रिकेटमधून निवृत्त होताच जॉब इंटरव्ह्यूला पोहोचला युवराज सिंग!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 12:52 PM2019-06-30T12:52:01+5:302019-06-30T12:52:51+5:30
टीम इंडियातील दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय आणि इंडियन प्रीमिअर लीगमधून नुकतीच निवृत्ती जाहिर केली आणि चाहते हिरमुसले. पण आता युवराजच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे.
टीम इंडियातील दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय आणि इंडियन प्रीमिअर लीगमधून नुकतीच निवृत्ती जाहिर केली आणि चाहते हिरमुसले. पण आता युवराजच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. होय, क्रिकेटनंतर एका नव्या फिल्डमध्ये युवराज आपले नशीब आजमावणार आहे. होय, क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर तुमचा आमचा लाडका युवी एंटरटेनमेंटच्या दुनियेत एन्ट्री घेतोय.
सध्या युवीचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडिओत युवी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर एका ऑफिसात जॉब इंटरव्ह्यू देताना दिसतोय. युवराजचा हा फनी व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड भावला आहे. या व्हिडीओत युवीसोबत अभिनेता गोपाल दत्त आणि मुकूल चड्ढा दिसत आहेत. आता हा व्हिडीओ आहे तरी कशाचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तो आहे एका वेब शोचा. होय, युवराजचा हा वेब शो एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे. ‘द ऑफिस ’ असे या शोचे नाव आहे.
Yuvi Retires. Chaddha Hires. Will he take up the Wilkins Chawla Challenge? #TheOfficeIndia@YUVSTRONG12@mukulchadda@thegopaldattpic.twitter.com/DzJQ6pNJzG
— Hotstar Specials (@HotstarSpecials) June 29, 2019
क्रिकेटच्या मैदानात चौकार-षटकार ठोकणारा युवराज याआधीही फिल्मी पडद्यावर दिसला आहे. युवराजचे वडील योगराज सिंग यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेक पंजाबी चित्रपटांत काम केले होते. वडिलांच्याच एका चित्रपटात युवराज बालकलाकार म्हणून दिसला होता. मेहेंदी शगना दी या 1992 ला प्रदर्शित झालेल्या चित्रपटात युवराज झळकला होता. या चित्रपटात एका शाळेत जाणाºया मुलाच्या भूमिकेत तो दिसला होता. या चित्रपटाच्या वेळी युवराजचे वय केवळ 11 वर्षं इतकेच होते.
Office toh kaafi alag alag dekhe honge aapne, par aisa ajeeb office kabhi nahi dekha hoga. Vishwas nahi ho raha toh khud dekh lo! #TheOfficeIndiahttps://t.co/aJBfTWBnmQ
— yuvraj singh (@YUVSTRONG12) June 29, 2019
मागील दोन वर्ष मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या युवीने मनावर दगड ठेवून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. अर्थात युवराजचा निवृत्तीचा निर्णय तडकाफडकी नव्हता. निवृत्ती घेण्याचा वर्षभरापूर्वीच विचार केला होता, असे युवीने सांगितले होते.