​कमाल रशिद खान उर्फ केआरके का मागतोय भारत सरकारकडून झेड प्लस सिक्युरीटी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 10:18 AM2017-09-11T10:18:18+5:302017-09-11T15:48:18+5:30

कमाल रशिद खान उर्फ केआरके आणि वाद यांचे खूपच जवळचे नाते आहे. ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याचे नेहमीच ...

Zad Plus Security from the Government of India, Max Rashid Khan alias KRK? | ​कमाल रशिद खान उर्फ केआरके का मागतोय भारत सरकारकडून झेड प्लस सिक्युरीटी?

​कमाल रशिद खान उर्फ केआरके का मागतोय भारत सरकारकडून झेड प्लस सिक्युरीटी?

googlenewsNext
ाल रशिद खान उर्फ केआरके आणि वाद यांचे खूपच जवळचे नाते आहे. ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याचे नेहमीच कोणा ना कोणासोबत वाद होत असतात. आक्षेपार्ह ट्वीट करणे, ट्वीटच्या माध्यमातून उगाचच सगळ्यांसोबत पंगा घेणे ही केआरकेची खूप जुनी सवय आहे. केआरकेचा वाद नुकताच अभिनेता श्रेयस तळपदेसोबत झाला असून या वादानंतर केआरकेने भारत सरकारकडे झेड प्लस सिक्युरिटीची मागणी केली आहे.
श्रेयस तळपदेने एक अभिनेता म्हणून मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. तो आता गोलमाल ४ या चित्रपटातदेखील झळकणार आहे. अभिनयानंतर आता तो दिग्दर्शन क्षेत्राकडे वळला आहे. पोस्टर बॉइज हा त्याने दिग्दर्शित केलेला चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटात सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी एक करोड ७५ लाखाची कमाई केली. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईविषयी चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्वीट केले होते. तरण आदर्श यांच्या ट्वीटनंतर केआरकेने या चित्रपटाची आणि चित्रपटातील कलाकारांची टर उडवायला सुरुवात केली. 

shreyas talpade

कोणत्याही चित्रपटाची अथवा कलाकारांची टर उडवणे हे केआरकेसाठी नवीन नाहीये. पण अनेकवेळा हे कलाकार केआरकेकडे दुर्लक्ष करणेच पसंत करतात. पण श्रेयसने तसे काहीही न करता केआरकेला सडेतोड उत्तर दिले. श्रेयसने केआरकेला त्याच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिले. त्याने केआरकेला त्याच्या मर्यादेत राहायला सांगितले. तसेच त्याने मर्यादा ओलांडली तर तो मारच खाईल असे देखील श्रेयसने ट्वीटमध्ये लिहिले. श्रेयसचे हे ट्वीट वाचून केआरके लगेचच म्हणाला की, मला भारत सरकारकडून झेड प्लस सिक्युरीटी हवी आहे. 
पोस्टर बॉइज या चित्रपटात नसबंदीच्या जाहिरातीवर चित्रपटातील तीन नायकांचे फोटो चुकून आरोग्य अधिकाऱ्यांकडून छापले जातात आणि मग पुढे काय काय होते याचा एक धमाल प्रवास प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळत आहे. 

Also Read : श्रेयस तळपदे ‘या’ खानवर भडकला; म्हटले ‘औकातमध्ये रहा, जय महाराष्ट्र!’
 

Web Title: Zad Plus Security from the Government of India, Max Rashid Khan alias KRK?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.