सोनाक्षी सिन्हाच्या 'या' एका सवयीचा पती जहीर इक्बालला झाला त्रास, खुलासा करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 04:04 PM2024-08-05T16:04:49+5:302024-08-05T16:10:43+5:30
सोनाक्षी आणि जहीर हे त्यांचे सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. सोनाक्षीने बॉयफ्रेंड जहीर इक्बालशी (Zaheer Iqbal) रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असल्याचं दिसतं. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षी सिन्हा आणि जहीर दिसत असतात. आता नुकतंच जहीरने त्याच्या इंस्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यानं सोनाक्षीबद्दल मोठा खुलासा केला.
सोनाक्षी आणि जहीर हे त्यांचे सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. ते दोघे अधूनमधून पार्ट्यांना हजेरी लावताना दिसतात. अशातच ते दोघे एका पार्टीत एकत्र गेले. मात्र, तिथे गेल्यावर त्यांना समजले की, ते दोघे पार्टी सुरू होण्याच्या एक तास अगोदर तिथे पोहोचले आहेत. मग काय, सोनाक्षीचा पती जहीरने सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट लिहिली. तो म्हणतो, "वेळ वाया जातोय. आज आम्ही एका पार्टीत वेळेच्या एक तास अगोदरच आलो. यासाठी जबाबदार आमची 'बेबी' सोनाक्षी आहे. ती प्रचंड वक्तशीर आहे. त्यामुळे आता आम्हाला इथे टाईमपास करायला लागतोय".
सोनाक्षी आणि जहीर २३ जून रोजी लग्नबंधनात अडकले. मुंबईतील घरीच त्यांनी कोर्ट मॅरेज केले. सोनाक्षी आणि जहीर गेल्या ७ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. २३ जूनला लग्न करत त्यांनी आयुष्यभर एकमेकांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. अखेर धर्माच्या भिंती पाडून रजिस्टर पद्धतीने सोनाक्षी आणि जहीर लग्नाच्या बेडीत अडकले. त्यानंतर त्यांचं ग्रँड रिसेप्शन पार पडलं. याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते.