जहीर इक्बाल बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी या क्षेत्रात होता कार्यरत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 08:02 PM2019-03-19T20:02:34+5:302019-03-19T20:04:38+5:30
अभिनेता जहीर इक्बाल लवकरच नोटबुक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्याच्यासोबतच अभिनेत्री प्रनुतन बहलदेखील बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे.
अभिनेता जहीर इक्बाल लवकरच नोटबुक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्याच्यासोबतच अभिनेत्री प्रनुतन बहलदेखील बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. नोटबुक चित्रपटाच्या ट्रेलर व गाण्यांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. जहीर इक्बाल बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी कंस्ट्रक्शन बिझनेसमध्ये कार्यरत होता.
जहीर इक्बालने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,माझे अभिनेता बनण्याचे स्वप्न होते. त्याला मरण्यापूर्वी चित्रपटात काम करायचे होते. मी कंस्ट्रक्शन बिझनेसमध्ये होतो. मला झटपच पैसे कमवून चित्रपटाची निर्मिती करायची होती व त्यात काम करायचे होते. मात्र नशीबाने नोटबुक चित्रपट मिळाला. कोणत्याही कलाकाराच्या पदार्पणासाठी अगदी योग्य सिनेमा आहे कारण या चित्रपटाचे निर्माते सलमान सर व राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नितीन कक्कड होते.
कधीही एकमेकांना न भेटलेल्या पण प्रेमात पडलेल्या जोडप्याची कथा तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'नोटबुक' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये जहीर इकबाल व प्रनूतन बहल यांची केमिस्ट्री दिसली आहे. या सिनेमाचे अधिकाधिक चित्रीकरण हे काश्मीरमध्ये झाले आहे. 'नोटबुक' चित्रपटात २००७ सालातील कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात तलवाच्या मध्यभागी असलेल्या एका शाळेवर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे.
सलमान खान फिल्म्स प्रस्तुत 'नोटबुक' चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कड यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमा खान, मुराद खेतानी व अश्विन वर्दे यांनी केली असून हा चित्रपट २९ मार्चला प्रदर्शित होणार आहे.