विराट-अनुष्कानंतर जहिर खान-सागरिका घाटगेच्या घरी हलणार पाळणा, होणार आई-बाबा?

By गीतांजली | Updated: October 12, 2020 15:37 IST2020-10-12T12:54:18+5:302020-10-12T15:37:22+5:30

सागरिका प्रेग्नेंट असल्याची बातमी आहे.

Is zaheer khan wife actress sagarika ghatge pregnant and expecting first baby | विराट-अनुष्कानंतर जहिर खान-सागरिका घाटगेच्या घरी हलणार पाळणा, होणार आई-बाबा?

विराट-अनुष्कानंतर जहिर खान-सागरिका घाटगेच्या घरी हलणार पाळणा, होणार आई-बाबा?

अलीकडेच भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज झहीर खानने आपला वाढदिवस साजरा केला.यावेळी त्याची पत्नी आणि अभिनेत्री सागरिका घाटगेने एक खूप छान फोटो शेअर केला होता. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार सागरिका प्रेग्नेंट आणि लवकरच हे कपल आई-वडील होणार आहेत. जहीर खान आणि सागरिका 2017मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. रिपोर्टनुसार सागरिका आणि जहीरच्या काही मित्र-मैत्रिणींनी या बातमीला कन्फर्म केले आहे लवकरच दोघांच्या घरी पाळणा हलणार आहे. अद्याप सागरिका-जहीरने या वृत्ताला दुजोर दिला नाही. 


सागरिका एका शाही कुटुंबीतील मुलगी आहे. तिचे वडील विजयेंद्र घाडगे हिंदी सिनेमातील प्रसिद्ध चेहरा आहेत. त्याचसोबत सागरिकाची आजी सीता राजे घाडगे या इंदौरच्या महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या कन्या होत्या. सागरिकाला शिक्षणा दरम्यान अनेक सिनेमा आणि जाहिरातींच्या ऑफर यायला लागल्या होत्या. मात्र तिच्या वडिलांनी स्पष्ट नकार दिला. 2013 मध्ये आलेल्या रश या 'इमरान हाश्मी'सोबत दिसली होती. 'चक दे इंडिया' सिनेमातून सागरिकाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. हिंदीशिवाय सागरिकाने पंजाबी आणि मराठी सिनेमांमध्ये सुद्धा काम केले आहे. पंजाबी सिनेमा दिलदरिया तिचा खूप हीट ठरला होता.


आजही सागरिका चक्क दे गर्ल म्हणूनच ओळखली जाते. सागरिकाने प्रसिद्ध क्रिकेटर झहीर खानसोबत नोव्हेंबर २०१७ मध्ये लग्न केले. लग्नानंतर सागरिकाने सिनेमांपासून दूर गेली. अभिनेत्री शिवाय सागरिका नॅशनल हॉकी प्लेअर आहे. याच कारणामुळे सागरिका 'चक दे इंडिया'त दिसली होती.

ValentinesDay2020 : फक्त 'या' एकाच गोष्टीमुळे जमलं झहीर खान आणि सागरिका घाटगे यांचं लग्न

 

Web Title: Is zaheer khan wife actress sagarika ghatge pregnant and expecting first baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.