अभिनेत्री जरीन खानचं ब्रेकअप, तीन वर्षांपासून Bigg Boss फेम 'या' अभिनेत्याला करत होती डेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 16:20 IST2024-09-03T16:20:15+5:302024-09-03T16:20:54+5:30
काही दिवसांपूर्वीच त्यांचं नातं तुटलं असून आपली सहमतीने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

अभिनेत्री जरीन खानचं ब्रेकअप, तीन वर्षांपासून Bigg Boss फेम 'या' अभिनेत्याला करत होती डेट
सलमान खानसोबत 'वीर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जरीन खान (Zareen Khan) सध्या चर्चेत आहे. नुकताच अभिनेत्रीचा ब्रेकअप झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून ती बिग बॉस 12 फेम शिवाशीष मिश्रासोबत (Shivashish Mishra) तिचं नाव जोडलं जात होतं. मात्र आता तिच्या जवळच्या मित्राने जरीनचा ब्रेकअप झाल्याचं स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचं नातं तुटलं असून आपली सहमतीने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
ई टाइम्सच्या रिपोर्टनुसार, शिवाशिष मिश्राच्या वाढदिवसाच्या काही दिवस आधीच दोघंही वेगळे झाले. जरीन आणि शिवाशिषने एकमेकांना सोशल मीडियावरही अनफॉलो केलं आहे. अद्याप दोघांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तसंच कोणतीही सोशल मीडिया पोस्टही केलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, जरीन आणि शिवाशिष 2021 पासून एकमेकांना डेट करत होते. त्याचवर्षी जरीन एका मुलाखतीत म्हणाली होती की, "आम्ही एकमेकांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही एकसारखेच आहोत आणि आम्हाला एकमेकांसोबत राहायलाही आवडतं. हे नातं कुठपर्यंत जातं बघुया. काही महिन्यांपूर्वीच आमची ओळख झाली आहे. त्यामुळे आताच कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू नये असं मला वाटतं.आता आम्ही डेट करो किंवा ना करो आम्ही कायम चांगले मित्र असू."
भारती सिंहसोबतच्या पॉडकास्टमध्ये जरीन खान लग्नाविषयी म्हणाली होती की, "कोणीही मला लग्नासाठी प्रपोज करत नाही. मला लग्नच करायचं नाही. मला कधीच करायचंही नव्हतं. आजकाल लग्न तीन महिनेही टिकत नाही. जसं स्वाईप करुन खायला ऑर्डर करतो तसं आता लोकांचे फोटो स्वाईप केले जात आहेत. हे फारच विचित्र आहे."