प्लीज माझ्या आईसाठी प्रार्थना करा...! अभिनेत्री जरीन खानची आई पुन्हा रूग्णालयात भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 12:55 PM2021-05-28T12:55:41+5:302021-05-28T12:58:38+5:30
Zareen Khan mother hospitalised : दीड महिन्यांपासून जरीनची आई आजारी आहे आणि जरीन तिची सेवा करतेय.
अभिनेत्री जरीन खान (Zzareen Khan) सध्या अनेक अडचणींचा सामना करतेय. गेल्या दीड महिन्यांपासून ती सोशल मीडियापासून दूर होती. आत्ता कुठे यामागच्या कारणाचा खुलासा केला. दीड महिन्यांपासून जरीनची आई आजारी आहे आणि जरीन तिची सेवा करतेय. आता जरीनच्या आईला पुन्हा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. माझ्या आईसाठी प्रार्थना करा, असे आवाहन करत जरीनने आईच्या प्रकृतीबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. ( Zareen Khan mother hospitalised )
तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘मला माहितेय मला थोडा उशिर झालाय, पण माझ्या वाढदिवसाच्या आणि ईदच्या शुभेच्छा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मला त्यावेळी वैयक्तिकरित्या तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करणे जमले नाही. ग़ेल्या दीड महिन्यांपासून माझी आई आजारी आहे. तिची काळजी घेतेय. वारंवार रूग्णालयात जावे लागतेय. आता तिला पुन्हा रूग्णालयात भरती करावे लागलेय. कृपा करून माझी आई लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करा,’ असे तिने तिच्या या पोस्टमध्ये लिहिले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानने सलमान खानसोबत ‘वीर’ चित्रपटातून डेब्यू केला होता. हुबेहुब कतरीना कैफ सारखी दिसते म्हणून तिची बरीच चर्चा झाली होती.
मध्यंतरी कतरिनासोबतच्या तुलनेवर जरीनने नाराजी व्यक्त केली होती. कतरिनामुळे माझे करिअर बरबाद झाले, असे जरीन म्हणाली. आधी मी आईसारखी दिसते, असे लोक म्हणायचे. पण चित्रपटसृष्टीत आले आणि मी कतरिना कैफसारखी दिसते, असे लोक म्हणू लागले. आज कोणताही निर्माता-दिग्दर्शक माझ्या सोबत काम करू इच्छित नाही. मी कतरिनासारखी दिसते असे त्यांना वाटते. अशात एका डुप्लिकेटना कोणता निर्माता काम देईन? असा सवाल करत तिने मनातील भडास काढली होती.
काही लोकांनी तर मी प्रिती झिंटासारखी दिसते म्हटले. काहींनी मी पूजा भट सारखी दिसते म्हटले. मी जरीन खान आहे, असे लोक कधीच म्हणत नाहीत. प्रत्येकजण बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी धडपड असतो. मी सुद्धा त्यापैकीच एक पण एका अभिनेत्रीची डुप्लिकेट म्हणून माझ्या माथी शिक्का मारला गेला आणि माझे करिअर बरबाद झाले, अशा शब्दांत तिने तिची नाराजी व्यक्त केली होती.
‘वीर’नंतर हाऊसफूल 2, हेट स्टोरी 2 या सिनेमातही ती दिसली होती. यानंतर मात्र तिचा ‘1921’ हा सिनेमा आपटला. 2017 मध्ये रिलीज झालेला ‘अक्सर 2’ हा सिनेमाही फ्लॉप ठरला. यामुळे तिने पंजाबी व तेलगू सिनेमांकडे मोर्चा वळवला.