'ही तर फिमेल सोहेल खान'; वाढलेल्या वजनामुळे जरीन खान ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 18:27 IST2023-03-05T18:26:12+5:302023-03-05T18:27:40+5:30
Zareen khan: कतरिना कैफची कार्बन कॉपी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जरीनच्या लूकमध्ये कमालीचा बदल झाला असून अनेकांनी तिला वाढलेल्या वजनावरुन ट्रोल केलं आहे.

'ही तर फिमेल सोहेल खान'; वाढलेल्या वजनामुळे जरीन खान ट्रोल
सलमान खानच्या( salman khan) 'वीर' (veer) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे जरीन खान. गेल्या काही दिवसांपासून जरीन तिच्या बदललेल्या लूकमुळे चर्चेत येत आहे. कतरिना कैफची कार्बन कॉपी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जरीनच्या लूकमध्ये कमालीचा बदल झाला असून अनेकांनी तिला वाढलेल्या वजनावरुन ट्रोल केलं आहे. इतकंच नाही तर अनेकांनी तिची तुलना सोहेल खान, डॉली बिंद्रा यांच्यासोबत करुन तिची खिल्ली उडवली आहे.
सध्या सोशल मीडियावर जरीनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये ती जीमच्या बाहेर पडताना दिसत आहे. मात्र, या व्हिडीओमध्ये ती कमालीची जाड झाल्याचंही दिसून येत आहे. त्यामुळेच नेटकऱ्यांनी तिची मस्करी केली आहे. इतकंच नाही तर तिचं बॉडी शेमिंग केलं आहे.
काय म्हणाले नेटकरी
'बापरे किती जाड झाली आहेस', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'मला तर ही डॉली बिंद्राची अपडेटेड वर्जन वाटतीये पण ही तर जरीन खान आहे', असंही एकाने म्हटलं आहे. इतकंच नाही तर, 'अरे बापरे ही तर फिमेल सोहेल खान आहे', असं म्हणत एकाने तिची खिल्ली उडवली आहे.
एकेकाळी कतरिना कैफसोबत व्हायची तुलना
जरीनने १३ वर्षांपूर्वी कलाविश्वात पदार्पण केलं. वीर या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाय ठेवला. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. मात्र, तिची तुलना कतरिना कैफसोबत होऊ लागली. जरीन बऱ्यापैकी कतरिनासारखी दिसत असल्यामुळे तिला लोक कतरिनाची कार्बन कॉपी म्हणतात. जरीन कलाविश्वात फारशी सक्रीय नाही. मात्र, सोशल मीडियावर तिचा दांडगा वावर आहे.