'मैं हूँ ना फेम लक्ष्मण'चं body transformation पाहून व्हाल थक्क; फोटो पाहून ओळखणंही झालंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 07:02 PM2022-04-29T19:02:06+5:302022-04-29T19:05:29+5:30
Zayed khan: अलिकडेच जायदने त्याचे काही लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो कमालीचा वेगळा दिसत असून इतक्या वर्षात त्याने स्वत:वर प्रचंड मेहनत घेतल्याचं दिसून येत आहे.
सध्याच्या काळात कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी फिटनेस फ्रिक झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक जण त्यांच्या लूक्स आणि फिटनेसकडे लक्ष देत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता अनुपम खेर यांचं बॉडी ट्रान्सफर्मेशन चर्चेत आलं होतं. त्यानंतर आता अभिनेता जायद खान त्याच्या बदललेल्या लूकमुळे चर्चेत आला आहे.
अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला मैं हूँ ना हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. या चित्रपटात अभिनेता जायग खान याने शाहरुखच्या सावत्र भावाची लक्ष्मणची भूमिका साकारली होती. परंतु, या चित्रपटानंतर तो फार मोजक्या चित्रपटांमध्ये झळकला. त्यामुळे हा अभिनेता आता कसा दिसतो, काय करतो असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडायचे. यामध्येच बऱ्याच काळानंतर जायदने त्याचे लेटेस्ट फोटो अपलोड केले आहेत. विशेष म्हणजे इतक्या वर्षात त्याने केलेलं ट्रान्सफर्मेशन थक्क करणारं आहे.
अलिकडेच जायदने त्याचे काही लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो कमालीचा वेगळा दिसत असून इतक्या वर्षात त्याने स्वत:वर प्रचंड मेहनत घेतल्याचं दिसून येत आहे. जायदने इन्स्टाग्रामवर त्याचे काही फोटो शेअर करत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने अभिनेता हृतिक रोशनचे आभार मानले आहेत.
काय म्हणाला जायद खान?
या लूकसाठी कमालीची मेहनत करावी लागली आहे. पण, या काळात मी अनेक गोष्टी शिकलो. आणि, अखेर एक अभिनेता म्हमून मी माझ्या पुढील प्रवासासाठी सुरुवात केली आहे. खरं सांगायचं तर मी या सगळ्याला खूप मिस केलंय. या ट्रान्सफर्मेशन जर्नीमध्ये मला साथ देणाऱ्या अनेकांचे आभार मला मानायचे आहेत. माझी पत्नी, आई-वडील, माझ्या बहिणी फराह खान अली, सुझैन खान, सिमोन, एक भाऊ आणि मेंटर हृतिक रोशन. बारबेरियन फिटनेसने माझ्या बॉडी ट्रान्सफर्मेशन्साठी माझी खूप मदत केली.
दरम्यान, जायद खानने २००३ मध्ये चुरा लिया है तुमने या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर आलेल्या मैं हूँ ना या चित्रपटातून त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळली. या चित्रपटात त्याला शाहरुख खान, सुष्मिता सेन, सुनील शेट्टी आणि अमृता राव या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करायची संधी मिळाली. या चित्रपटानंतर तो 'दस', 'युवराज', 'अंजाना अंजानी' आणि 'ब्लू' या चित्रपटांमध्ये झळकला.