काय ती पोस्ट झायरा वसीमने लिहिलेली नाही? मॅनेजरने ऐकवली वेगळीच स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 15:09 IST2019-06-30T15:00:30+5:302019-06-30T15:09:53+5:30

अभिनेत्री झायरा वसीमने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला. तिच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चयार्चा धक्का बसला आहे. पण आता झायराच्या मॅनेजर तुहीनने काही वेगळीच स्टोरी सांगितली आहे.

zayra waseem announcement on quitting bollywood social reactions | काय ती पोस्ट झायरा वसीमने लिहिलेली नाही? मॅनेजरने ऐकवली वेगळीच स्टोरी

काय ती पोस्ट झायरा वसीमने लिहिलेली नाही? मॅनेजरने ऐकवली वेगळीच स्टोरी

अभिनेत्री झायरा वसीमने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला. सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट लिहून तिने हा निर्णय जाहिर केला.‘ बॉलिवूडमध्ये माझी प्रगती होत असली, तरी मी खूश नाही. हे क्षेत्र मला माझ्या ईमानपासून दूर खेचत आहे. मी अल्लाहच्या रस्त्यापासून भरकटले होते,’ असं तिने म्हटले आहे. साहजिकच तिच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चयार्चा धक्का बसला आहे. पण आता झायराच्या मॅनेजर तुहीनने काही वेगळीच स्टोरी सांगितली आहे. ‘झायराचे सर्व सोशल मीडिया अकाऊंट कम्प्रोमाईज झाले आहेत. ही पोस्ट तिने लिहिलेली नाही,’ असे या मॅनेजरने म्हटले आहे. याऊलट आज तक या वाहिनीशी बोलताना, मी स्वत: ही पोस्ट लिहिल्याचे झायराने स्पष्ट केले आहे.

ओमर अब्दुल्लांनी केले समर्थन




जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी झायराच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. ‘झायराच्या निर्णयावर किंवा तिने केलेल्या निवडीवर प्रश्न उपस्थित करणारे आपण कोण? आपल्या इच्छेनुसार जगण्याचा तिला पूर्ण हक्क आहे. तिने जो काही निर्णय घेतला आहे त्याने ती आनंदी असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो,’असे ट्विट ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे.

सोशल मीडियावर ट्रोल
झायराच्या बॉलिवूड सोडण्याचा निर्णय अनेकांना दुखावणारा ठरला आहे. काही लोकांनी याला योग्य ठरवले आहे तर काहींनी यावर टीकाही केली आहे. झायरा धर्माच्या मार्गावर गेली, असे काहींनी म्हटले आहे. बॉलिवूड सिंगर अभिजीत  भट्टाचार्यने हे सगळे झायराचे नाटक असल्याचे म्हटले आहे.

Web Title: zayra waseem announcement on quitting bollywood social reactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.