जायरा वसीम विनयभंग प्रकरणातील आरोपी म्हणतो, झोपेत असल्याने माझा चुकून पाय लागला!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 04:42 AM2017-12-11T04:42:55+5:302017-12-11T10:12:55+5:30
जायरा वसीम हिचा विमानात विनयभंग करणाºया आरोपीस अटक करण्यात आली आहे. विकास सचदेवा असे त्याचे नाव आहे. ३९ वर्षीय ...
ज यरा वसीम हिचा विमानात विनयभंग करणाºया आरोपीस अटक करण्यात आली आहे. विकास सचदेवा असे त्याचे नाव आहे. ३९ वर्षीय विकासने याप्रकरणी स्वत:ला निर्दोष सांगत, मी जाणीवपूर्वक काहीही केले नसल्याचे म्हटले आहे. अंधेरी ईस्टचा रहिवासी असलेल्या विकासची पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीत विकासने झोपेत हा सगळा प्रकार घडल्याचे सांगितले. मी दिल्लीला एका अंत्यसंस्कारासाठी गेलो होतो. जागरण झाल्याने मी प्रचंड थकलेला होता. विमानात क्रू मेंबर्सला ब्लँकेट मागून मी झोपी गेला. मला डिस्टर्ब करायचे नाही, असेही झोपताना मी क्रू मेंबर्सला सांगितले होते. मी इतका थकलेलो होतो की, विमानात जेवणही केले नाही. कदाचित झोपेत माझा पाय लागला असावा. मी जाणीवपूर्वक काहीही केले नाही. माझा पाय जायरा लागताच मी तिची माफी मागितली होती. मी जाणीवपूर्वक काहीही केलेले नाही, असे विकासने सांगितले.
विस्तारा विमान कंपनीच्या अधिका-यांनीही चौकशीदरम्यान विकास पूर्णवेळ झोपलेला होतो, असे सांगितले. दरम्यान विस्ताराचे चीफ स्ट्रॅटेजी व कर्मशिअल आॅफिसर संजीव कपूर यांनी याप्रकरणी आरोपी दोषी आढळल्यास त्याविरोधात कठोर कारवाई करण्याचा पुनरूच्चार केला. आरोपी दोषी आढळल्यास त्यांच्याविरोधात ‘नो फ्लाय’ नियमाअंतर्गत कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. जायरासोबत जे काही झाले, त्यासाठी आम्ही माफी मागतो, असेही ते म्हणाले.
ALSO READ : जायरा वसीमच्या व्हिडिओची गंभीर दखल; पोलिसांनी दाखल केला गुन्हा
रविवारी सकाळी जायराने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत, विस्तारा विमान कंपनीच्या विमानात घडलेला प्रकार सांगितला होता. या व्हिडिओत जायराने रडत रडत आपबीती सांगितली होती. दिसतेय. ‘मागच्या सीटवर बसलेला एक व्यक्ति पायाने माझ्या मानेला आणि पाठीशा स्पर्श करत होता. अंधाराचा फायदा घेऊन त्याने हे चाळे चालवले होते. मी त्याला विरोध केला. पण त्याला ओरडून सर्वांना सांगेल, अशी धमकीही दिली. पण त्याच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. विमानात मी याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्नही केला. मात्र अंधूक प्रकाशामुळे ते शक्य झाले नाही,’असा आरोप तिने या व्हिडिओत केला होता.