करियरमध्ये मिळणारं अपयशामुळे बॉलिवूडला करणार होत्या अलविदा, 'या' अभिनेत्यामुळे झाल्या प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 04:26 PM2020-11-19T16:26:06+5:302020-11-19T16:29:55+5:30
'हरे रामा हरे कृष्णा’ साठी देव आनंद यांची पहिली पसंत जाहिदा होत्या, मात्र जाहिदा, देव आनंदच्या बहिणीच्या भूमिकेपेक्षा त्यांच्या प्रेयसीची भूमिका करण्यासाठी जास्त उत्सुक होत्या.
राजेश खन्ना सुपरस्टार असले तरी हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले चॉकलेट हिरो म्हणून देव आनंद यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलं ते त्यांच्या रोमांटिक इमेजमुळे ....हीच देव साहेबाची इमेज तरुणींना घायाळ करायची.... देवसाहेबांनी चित्रपटसृष्टीला काही नव्या अनमोल तारकाही दिल्या आहेत यांत हरे कृष्णा हरे राम मधून सा-यांना वेड लावणा-या झीनत अमान यांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. हा झीनतच्या करिअरचा यशस्वी चित्रपट राहिला. त्यानंतर झीनतने मागे वळून पाहिले नाही.
1971 मध्ये ओपी रल्हन यांनी झीनतला 'हलचल’मधून बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला. 'हलचल’ आणि 'हंगामा’ सारखे चित्रपट फ्लॉफ झाल्यानंतर झीनत नाराज होऊन आपल्या आईकडे जर्मनीला परत जाणार होत्या.
'हरे रामा हरे कृष्णा’ साठी देव आनंद यांची पहिली पसंत जाहिदा होत्या, मात्र जाहिदा, देव आनंदच्या बहिणीच्या भूमिकेपेक्षा त्यांच्या प्रेयसीची भूमिका करण्यासाठी जास्त उत्सुक होत्या. त्यानंतर देव आनंद यांनी तनुजा यांनाही ऑफर दिली होती. मात्र त्या ही काही कारणामुळे हा सिनेमा करू शकल्या नाहीत. दरम्यान ही संधी झीनत अमान साइन करण्यात आले होते.
दिलखेचक अदा, घायाळ करणारं नृत्य यामुळे झीनत यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. ७० च्या दशकात झीनत यांच्याकडे सेक्स सिम्बल म्हणून पाहिलं जाऊ लागलं. आपल्या सौंदर्यानं रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं. मात्र त्यांचं हेच सौंदर्य त्यांना त्रासदायक ठरु लागलं. सुंदर असल्याचा त्रासही त्यांना सहन करावा लागला.
करिअरच्या सुरुवातीला प्रचंड स्ट्रगल सहन करावा लागला. करियरमध्ये मिळणारं अपयशामुळे त्यांनी बॉलिवूडला अलविदा करायचाही निर्णय घेतला होता. मात्र त्याचवेळी देव आनंद यांनी संधी दिली आणि पुढे निराश न होता आपले काम सुरू ठेवले.