चलो कोना पकड लो! नवाजुद्दीनसोबत रोमान्स करणं होतं कठीण, झीशान अय्यूबने शेअर केला 'हड्डी'चा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 12:01 PM2023-09-11T12:01:52+5:302023-09-11T12:04:09+5:30

मी नवाजुद्दीनचा लव्हर आहे.

zeeshan ayyub says it was difficult to romance with nawazuddin siddiqui in haddi shared experience | चलो कोना पकड लो! नवाजुद्दीनसोबत रोमान्स करणं होतं कठीण, झीशान अय्यूबने शेअर केला 'हड्डी'चा अनुभव

चलो कोना पकड लो! नवाजुद्दीनसोबत रोमान्स करणं होतं कठीण, झीशान अय्यूबने शेअर केला 'हड्डी'चा अनुभव

googlenewsNext

अभिनेता झीशान अय्यूब (Zeeshan Ayyub) सध्या 'हड्डी' सिनेमामुळे चर्चेत आहे. यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) तृतीयपंथियाची भूमिका साकारत आहे. तर झीशान अय्यूबने नवाजुद्दीनसोबत रोमान्स केला आहे. सिनेमात काम करण्याचा अनुभव नेमका कसा होता याबद्दल झीशानने दिलखुलासपणे संवाद साधला आहे. 

झीशान म्हणाला, 'मला नेहमीच माझी भूमिका समजून घेणं कठीण जातं. सिनेमात मी एक एनजीओ चालवतो, वकील असतो. माझी स्वत:ची एक लढाई असते. मी नवाजुद्दीनचा लव्हर आहे. माझं त्याच्यावर खूप प्रेम असतं. ही भूमिका करताना माझ्या मनात हेच होतं की मी अगदी सामान्य दिसलो पाहिजे. तुम्हाला तुमच्यातलाच वाटलो पाहिजे. मला ही भूमिका साकारल्यावर समजलं की एका तृतीयपंथियाला प्रेमाची मागणी कशी घातली जाते. मला कळलं की प्रेम ही काही शारिरीक गोष्ट नाही. तुम्ही त्या माणसाच्या प्रेमात असता त्याच्या शरिराच्या नाही. जर मी एखाद्या व्यक्तीसोबत एक तास काहीही न बोलता वेळ काढू शकतो म्हणजेच माझं त्याच्यासोबत चांगलं बाँडिंग आहे. हे प्रेम रुहानी आहे.'

नवाजुद्दीनसोबत रोमान्स

झीशान पुढे म्हणाला, 'सेटवर नवाज भाई नेहमी म्हणायचे अरे चलो, कोना पकड लो. आम्ही दोघंही एनएसडीमधून शिकलो आहे. दोघांच गिव्ह अँड टेक खूपच स्मूथ होतं. आमचा पहिलाच सीन लग्नाचा होता. आम्हाला इतकंच सांगण्यात आलं होतं की कोर्ट मॅरेज आहे आणि तुमच्या दोघांचं लग्न आहे. आम्ही खूप सहजतेने अॅक्शन रिअॅक्शन देत होतो. काहीच सांगण्यात आलं नव्हतं. तिथूनच केमिस्ट्री बनायला सुरुवात झाली. नवाजनेच मला कंफर्ट दिला ज्यामुळे मी मोकळेपणाने सीन करु शकलो. त्याने खरं तर मला भूमिका साकारण्यात खूप मदत केली.'

Web Title: zeeshan ayyub says it was difficult to romance with nawazuddin siddiqui in haddi shared experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.