शाहरुख खानला ‘जोर का झटका’! बॉक्स ऑफिसवर ‘झिरो’ ओपनिंग!!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 02:24 PM2018-12-24T14:24:19+5:302018-12-24T14:24:50+5:30
सुपरस्टार शाहरुख खान दीर्घकाळापासून एका ‘हिट’च्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे नुकत्याच रिलीज झालेल्या ‘झिरो’कडून शाहरुखला प्रचंड अपेक्षा होत्या. पण प्रदर्शनानंतरच्या तीन दिवसांतील बॉक्स ऑफिसचे आकडे बघितल्यावर खुद्द शाहरुखचीही निराशा होईल.
सुपरस्टार शाहरुख खान दीर्घकाळापासून एका ‘हिट’च्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे नुकत्याच रिलीज झालेल्या ‘झिरो’कडून शाहरुखला प्रचंड अपेक्षा होत्या. पण प्रदर्शनानंतरच्या तीन दिवसांतील बॉक्स ऑफिसचे आकडे बघितल्यावर खुद्द शाहरुखचीही निराशा होईल. मोठा गाजावाजा करत ‘झिरो’ रिलीज झाला. पण प्रेक्षक आणि समीक्षक दोन्हींकडून या चित्रपटाला नकारात्मक प्रतिसाद मिळाला. शाहरुखचा सर्वोत्कृष्ट अभिनय असूनही चित्रपटाची सुमार कथा ‘झिरो’ला घेऊन डुबली.
#Zero has clearly underperformed... Remained on similar levels over the weekend... No turnaround / big jump in biz... #Christmas holiday [tomorrow] should boost biz... Real test on Wed and Thu... Fri 20.14 cr, Sat 18.22 cr, Sun 20.71 cr. Total: ₹ 59.07 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) December 24, 2018
पहिल्या दिवशी चित्रपटाने २०.१४ कोटी कमावले. शाहरुख्नच्या चित्रपटाला २०.१४ कोटींची ओपनिंग हा आकडा तसा फार समाधानकारक म्हणता येणार नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तरी या आकड्यात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. पण झाले वेगळेच, दुस-या दिवशी गल्ला वाढण्याऐवजी त्यात घट दिसली. दुस-या दिवशी चित्रपटाने केवळ १८.२२ कोटींची कमाई केली. म्हणजे, शुक्रवारच्या तुलनेत शनिवारच्या कमाईत ९.५३ टक्के घट दिसली. तिस-या दिवशी म्हणजे काल रविवारी या चित्रपटाने २०.७१ कोटी कमावले. म्हणजे ‘झिरो’चे एकूण ओपनिंग वीकेंड कलेकक्शन ५९.०७ कोटी राहिले. विशेष म्हणजे, ख्रिसमसला प्रदर्शित झालेल्या गेल्या तीन वर्षांतील ‘झिरो’हा सर्वात कमी ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. गत वर्षी ख्रिसमसला सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ प्रदर्शित झाला होता. पहिल्याच दिवशी त्याने ३४.१० कोटी रुपये कमावले होते. त्याआधी २०१६ मध्ये आमिर खानच्या ‘दंगल’ने पहिल्या दिवशी २९.७८ कोटींचा गल्ला जमवला होता. २०१५ मध्ये शाहरुखच्याच ‘दिलवाले’ने २१ कोटींच्या कमाईने ओपनिंग केली होती.
एकीकडे ‘झिरो’ही गत झाली असताना साऊथच्या ‘केजीएफ’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर जोरदार मुसंडी मारली. एकट्या अमेरिकेत या चित्रपटात सुमारे ३०० हजार डॉलर कमावले. चेन्नई बॉक्स ऑफिसवर तर या चित्रपटाने धूम केली.