‘गली बॉय’ हिट होताच झोया अख्तरने केली नव्या चित्रपटाची घोषणा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 12:58 PM2019-02-15T12:58:37+5:302019-02-15T13:04:25+5:30

होय, तिच्या या नव्या चित्रपटाबद्दल कळल्यावर चाहत्यांच्याही उत्साहाला उधाण येईल. विशेष म्हणजे, या आगामी चित्रपटासाठी झोया  हृतिक रोशनला साईन करतीये.

Zoya Akhtar: Planning to make sequel to Zindagi Na Milegi Dobara | ‘गली बॉय’ हिट होताच झोया अख्तरने केली नव्या चित्रपटाची घोषणा!!

‘गली बॉय’ हिट होताच झोया अख्तरने केली नव्या चित्रपटाची घोषणा!!

googlenewsNext

बॉलिवूड दिग्दर्शिका झोया अख्तर एक प्रतिभावान दिग्दर्शिका आहे, यात जराही शंका नाही. त्यामुळेचं सिनेप्रेमी तिच्या चित्रपटाची प्रतीक्षा करत असतात. ‘लक बाय चान्स’ असो की ‘गली बॉय’, झोयाने एकापेक्षा एक दमदार चित्रपट दिलेत. काल रिलीज झालेल्या ‘गली बॉय’ने तर बॉक्सआॅफिसवर धूम केलीय. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम रचलेत. पहिल्या दिवशीचे ओपनिंग बघता रणवीर सिंग व आलिया भट्ट स्टारर ‘गली बॉय’ सुपरहिट ठरणार,  यात वाद नाही आणि आता हा चित्रपट हिट होताच झोयाने आपल्या नव्या चित्रपटाची तयारी सुरु केलीये. होय, तिच्या या नव्या चित्रपटाबद्दल कळल्यावर चाहत्यांच्याही उत्साहाला उधाण येईल. विशेष म्हणजे, या आगामी चित्रपटासाठी झोया  हृतिक रोशनला साईन करतीये.


एका मुलाखतीत झोयाने या आगामी चित्रपटाबद्दल माहिती दिली. हृतिक रोशनसोबत पुन्हा काम करण्यास मी आतूर आहे. मी लवकरच ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सीक्वल बनवणार आहे.  एक चांगली स्क्रिप्ट मिळताच, मी यावर काम सुरु करेल. कॅटरिना कैफ, फरहान अख्तर, कल्की कोच्लिन आणि हृतिक रोशन माझ्यासाठी खास आहेत. ते माझे चांगले मित्र आहेत. म्हणून मी ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सीक्वल बनवणार. पैशांसाठी मुळीच नाही, असे झोयाने यावेळी सांगितले.
‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. आता झोयाने  या चित्रपटाचा सीक्वल बनवण्याचे मनावर घेतलेय. साहजिकच या चित्रपटावरही प्रेक्षकांच्या उड्या पडणार. तुम्हाला काय वाटते?

Web Title: Zoya Akhtar: Planning to make sequel to Zindagi Na Milegi Dobara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.