बॉलिवूडच्या 5 धक्कादायक आणि सर्वात जास्त गाजलेल्या अफवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 01:06 PM2018-06-11T13:06:27+5:302018-06-11T13:07:31+5:30

काही अफवा इतक्या गाजतात की, त्यांची चर्चा वर्षांनुवर्षे सुरुच राहतात. अशाच काही धक्कादायक अफवा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Bollywood's 5 Shocking and Worst Rumors! | बॉलिवूडच्या 5 धक्कादायक आणि सर्वात जास्त गाजलेल्या अफवा!

बॉलिवूडच्या 5 धक्कादायक आणि सर्वात जास्त गाजलेल्या अफवा!

googlenewsNext

मुंबई : बॉलिवूडमधील कलाकारांबाबत रोज काहीतरी ऐकायला मिळत असतं. त्यातील काही गोष्टी तर या केवळ अफवा असतात. त्यावर इतकी चर्चा होते की, त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हेही कळत नाही. काही अफवा इतक्या गाजतात की, त्यांची चर्चा वर्षांनुवर्षे सुरुच राहतात. अशाच काही धक्कादायक अफवा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

1) शाहरुख खान आणि प्रियंकाचं सिक्रेट लग्न

काही वर्षांपूर्वी झालेली बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि प्रियंका चोप्रा यांच्यातील अफेअरची चर्चा सर्वांनाच माहीत असेल. दोघांमध्ये चांगलीच जवळीकता वाढली होती. इतकेच काय तर या दोघांनी कॅनडामध्ये सर्वांच्या लपून लग्न केल्याचीही अफवा पसरली होती. त्यामुळे गौरी आणि शाहरुखमध्ये वादही झाल्याची अफवा परसली होती. त्यासोबतच प्रियंका ही हॉलिवूडमध्ये शाहरुखमुळेच असल्याचीही अफवा जोरात होती. 

2) प्रियंका चोप्राने केली प्लॅस्टिक सर्जरी

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आता बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपली जादू चालवत आहे. प्रियंकाबाबत अनेक अफवा तुम्ही वाचल्या-ऐकल्या असतील. पण त्यात सर्वात जास्त गाजलेली अफवा म्हणजे प्रियंकाने प्लॅस्टिक सर्जरी केली. पण याबाबत कधीही प्रियंकाने अधिकृत माहिती दिली नाही.

3) सोनाक्षी सिन्हाची आई दुसरीच कुणीतरी?

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाबाबत सर्वात जास्त चर्चेत असलेली अफवा म्हणजे तिची आई पूनम ही तिची खरी आई नाहीये. यावर फारच जास्त चर्चा झाली. सोनाक्षी ही पूनम यांची नाहीतर अभिनेत्री रिना राय यांची मुलगी आहे. कारण शत्रुघ्न सिन्हा आणि रिना रायच यांचं अफेअर होतं. त्यासोबतच सोनाक्षीची स्माईल आणि लूकही रिना रायसारखाच आहे. त्यामुळे आजही काहीना काही ऐकायला मिळतं.

4) करण जोहर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचं अफेअर

करण जोहर याच्या स्टुडंट ऑफ द इअर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारा सिद्धार्थ मल्होत्रा याचं करण जोहरसोबत अफेअर असल्याची फार चर्चा झाली. दोघांची चांगली मैत्री आहे पण त्यांच्या नात्याबाबत ही मोठी अफवा आहे. 

5) कंगणा राणावतने एक्स बॉयफ्रेन्डवर काळी जादू केली

बॉलिवूड क्विन म्हणून आता नावारुपाला आलेली अभिनेत्री कंगणा राणावत ही तिच्या अफेअर्समुळे चांगलीच चर्चेत असते. कंगणाने तिचा एक्स बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमनवर काळी जादू केल्याची अफवा फारच गाजली होती. 

Web Title: Bollywood's 5 Shocking and Worst Rumors!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.