बोअरिंग कॉमेडीत फसलेला ‘गेस्ट इन लंडन’

By Admin | Published: July 9, 2017 02:20 AM2017-07-09T02:20:25+5:302017-07-09T02:20:25+5:30

‘वन टू थ्री’, ‘सन आॅफ सरदार’ आणि ‘अतिथी तुम कब जाओगे’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या अश्विनी धीर यांनी ‘गेस्ट इन लंडन’ या चित्रपटातून प्रेक्षकांची

Born in a comedy 'Guest in London' | बोअरिंग कॉमेडीत फसलेला ‘गेस्ट इन लंडन’

बोअरिंग कॉमेडीत फसलेला ‘गेस्ट इन लंडन’

googlenewsNext

- जान्हवी सामंत

हिंदी चित्रपट - गेस्ट इन लंडन

‘वन टू थ्री’, ‘सन आॅफ सरदार’ आणि ‘अतिथी तुम कब जाओगे’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या अश्विनी धीर यांनी ‘गेस्ट इन लंडन’ या चित्रपटातून प्रेक्षकांची पुरती निराशा केली आहे. अभिनेता परेश रावल आणि कार्तिक आर्यन यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटात पाल्हाळपणा अधिक असल्याने प्रेक्षकांची पुरती निराशा झाल्याशिवाय राहत नाही.
चित्रपटाची कथा ‘लंडन’ बेस्ड आहे. ज्या ठिकाणी आर्यन ग्रोवर (कार्तिक आर्यन) आणि अनाया पटेल (कृती खरबंदा) एकत्र राहतात. काही दिवसांनंतर गावाकडून काका गंगाशरण गंदोत्रा (परेश रावल) आणि काकी गुड्डी (तनवी आजमी) यांची या दोघांच्या घरात एंट्री होते. त्यानंतर या चौघांमध्ये जो ड्रामा रंगतो, त्याभोवतीच संपूर्ण कथा रेंगाळत जाते. कधी मॉल, तर कधी आॅफिसमधील प्रसंग प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्याऐवजी त्यांचा संताप झाल्याशिवाय राहत नाही. पूर्व आणि पश्चिमेकडील संस्काराच्या चित्रपटात सांगितलेल्या गोष्टी कशाचाही ताळमेळ दाखवून देत नाहीत. कारण संस्कारासारख्या विषयाला कॉमेडीचे रूप दिल्याने प्रेक्षकांना पडद्यावर हा सर्व ड्रामा बघणे जड जाते.
एकूणच चित्रपटात दिग्दर्शकांनी दोन तास १८ मिनिटांचा ड्रामा उगाचच ओढूनताणून दाखविल्याचे दिसून येते. वास्तविक, चित्रपटाची सुरुवात काहीशी ताळमेळ साधणारी आहे. परंतु जसजशी कथा पुढे जाते, तशा चित्रपटातील कमजोर बाबी प्रकर्षाने जाणवतात. परेश रावलव्यतिरिक्त या चित्रपटातील एकही पात्र भारदस्त वाटत नसल्याने, त्यांचा अभिनय बघताना प्रेक्षकांना तिकिटासाठी पैसे खर्च केल्याचे दु:ख झाल्याशिवाय राहत नाही. काही सीन्स तर असेही आहेत जे उगाचच ओढूनताणून शूट केल्याची जाणीव करून देतात. त्याशिवाय चित्रपटातील गाण्यामध्ये फारसा दम नसल्याने चित्रपट चहुबाजूने कमकुवत होत जातो. कार्तिक आर्यन आणि कृती खरबंदा यांच्यातील रोमान्सही बेरंग करणारा असल्याने चित्रपट सर्वच पातळ्यांवर अयशस्वी होताना दिसतो. चित्रपटात अभिनेता अजय देवगण याचा कॅमिओ आणि परेश रावल व संजय मिश्रा यांची काहीशी भूमिका सोडल्यास दुसरे काहीच बघण्यासारखे नाही. वास्तविक, दिग्दर्शकांनी या चित्रपटाला अजय देवगण आणि कोंकणा सेन-शर्मा स्टारर ‘अतिथी तूम कब जाओगे’ या चित्रपटासारखा कॉमेडीचा तडका लावण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु यामध्ये ते पूर्णत: अयशस्वी होताना दिसले.

 

Web Title: Born in a comedy 'Guest in London'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.