#BottleCapChallengeने बॉलिवूड झाले क्रेजी; विद्युत जामवाल, टायगर श्रॉफने असे पूर्ण केले चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 01:39 PM2019-07-05T13:39:13+5:302019-07-05T13:43:37+5:30

 एकीकडे सोशल मीडियावर ##BottleCapChallenge ट्रेण्ड होतोय, दुसरीकडे या चॅलेंजने अनेक हॉलिवूड व बॉलिवूड स्टार्सला क्रेजी केले आहे. बॉलिवूडचे म्हणाल तर सर्वप्रथम अक्षय कुमारने हे चॅलेंज स्वीकारले. अक्षयच्या पाठोपाठ अभिनेता टायगर श्रॉफ, विद्युत जामवाल, कुणाल खेमु आदींनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे.

#BottleCapChallenge : vidyut jamwal, Tiger shroff, kunal khamu complete the bottle cap challenge | #BottleCapChallengeने बॉलिवूड झाले क्रेजी; विद्युत जामवाल, टायगर श्रॉफने असे पूर्ण केले चॅलेंज!

#BottleCapChallengeने बॉलिवूड झाले क्रेजी; विद्युत जामवाल, टायगर श्रॉफने असे पूर्ण केले चॅलेंज!

googlenewsNext
ठळक मुद्देअभिनेता कुणाल खेमूने अतिशय मजेशीर अंदाजात हे चॅलेंज पूर्ण केले.

 एकीकडे सोशल मीडियावर ##BottleCapChallenge ट्रेण्ड होतोय, दुसरीकडे या चॅलेंजने अनेक हॉलिवूड व बॉलिवूड स्टार्सला क्रेजी केले आहे. बॉलिवूडचे म्हणाल तर सर्वप्रथम अक्षय कुमारने हे चॅलेंज स्वीकारले. अक्षयच्या पाठोपाठ अभिनेता टायगर श्रॉफ, विद्युत जामवाल, कुणाल खेमु आदींनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे. या सर्वांनी चॅलेंजचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  हॉलिवूड स्टार इरोलसन ह्युज याने या चॅलेंजची सुरुवात केली.  त्यानंतर त्याने जेसन स्टेथमला हे चॅलेंज दिले. याशिवाय हॉलिवूड स्टार जॉन मेयरने सुद्धा या चॅलेंजचा व्हिडिओ शेअर केला आहे. हॉलिवूड नंतर आता बॉलिवूडमध्ये या चॅलेंजची क्रेझ वाढत आहे.
बॉटल कॅप चॅलेंजमध्ये आपल्या उंचीला समांतर बॉटल समोर ठेवली जाते. त्यानंतर गोल फिरून पायाने त्या बॉटलचे झाकण उडवण्याचा प्रयत्न केला जातो. हे करताना ती बॉटल खाली पडता कामा नये.  

चक्क तीन बॉटल्स घेऊन पूर्ण केले चॅलेंज


फिटनेस फ्रिक अभिनेता विद्युत जामवाल याने हे चॅलेंज थोड्या हटके पद्धतीने पूर्ण केले.  विद्युतने एक दोन नाही तर चक्क तीन बॉटल्स घेऊन हे चॅलेंज पूर्ण केले. विद्युत जामवालने केरळच्या सर्वात प्राचीन मार्शल आर्ट फॉर्ममधून मार्शल आर्टचे धडे घेतले आहेत. 

टायगरने बांधली डोळ्यावर पट्टी


फिटनेस आणि डान्ससाठी ओळखल्या जाणा-या टायगर श्रॉफने डोळ्यांवर पट्टी बांधून हे चॅलेंज पूर्ण केले.

अभिनेता कुणाल खेमूने अतिशय मजेशीर अंदाजात हे चॅलेंज पूर्ण केले. त्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही हसू रोखू शकणार नाही.

Web Title: #BottleCapChallenge : vidyut jamwal, Tiger shroff, kunal khamu complete the bottle cap challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.