बॉक्स आॅफिसवरील धडकन मंदावली

By Admin | Published: June 8, 2015 10:37 PM2015-06-08T22:37:41+5:302015-06-08T22:37:41+5:30

झोया अख्तरचे दिग्दर्शन असलेल्या व बड्या कलाकारांची गर्दी असलेल्या ‘दिल धडकने दो’ची बॉक्स आॅफीसवरील सुरूवात मंद राहिली.

The box office beats slow down | बॉक्स आॅफिसवरील धडकन मंदावली

बॉक्स आॅफिसवरील धडकन मंदावली

googlenewsNext

झोया अख्तरचे दिग्दर्शन असलेल्या व बड्या कलाकारांची गर्दी असलेल्या ‘दिल धडकने दो’ची बॉक्स आॅफीसवरील सुरूवात मंद राहिली. पहिल्या तीन दिवसांतील त्याचा व्यवसाय सामान्य समजला जात आहे. ‘दिल धडकने दो’वर १०० कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च झाले आहेत. फॅमिली ड्रामा असलेल्या या चित्रपटाची तिकीट बारीवरील सुरूवात खूपच हळू होती. पहिल्या दिवशी केवळ १० कोटींचा महसूल मिळाला. शनिवारी चित्रपटाची परिस्थिती बरी होती व व्यवसाय १३ कोटींचा व रविवारी तो १४ कोटींचा झाला. एकूण पहिल्या तीन दिवसांतील कमाई ३७ कोटींची झाली. चित्रपटाचे जाणकार तर या कमाईला बरी समजताहेत परंतु चित्रपटावर जेवढा खर्च झाला आहे तो बघितला तर ही कमाई फार काही चांगली समजत येणार नाही. मोठ्या शहरांतील श्रीमंत वर्ग या चित्रपटावर खुश असला तरी सामान्य प्रेक्षकांना तो काही ‘आपला’ वाटत नाही. चित्रपट बघणाऱ्यांची प्रतिक्रिया ही नकारात्मक येत असल्यामुळे चित्रपटाच्या व्यवसायाला ती मारक ठरत आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील कथानकासारखी गोष्ट आणि जवळपास तीन तासांची लांबी ‘दिल धडकने दो’च्या काही भयानक त्रुटींपैकी एक आहे. प्रेक्षकांना हे सहजपणे पचणारे नाही.
कंगना रानावतची भूमिका असलेला ‘तनु वेडस् मनु रिटर्न’चा सुरू असलेला धुमाकूळ ‘दिल धडकने दो’च्या व्यवसायावर विपरीत परिणाम करणारा ठरला आहे. ‘दिल धडकने दो’ बघणारे फार खुश नाहीत पण ‘तनु वेडस् मनु रिटर्न’ बघण्यासाठी चित्रपटगृहांवर गर्दी होत आहे. तिसऱ्या आठवड्यातील त्याच्या महसुलावरून याची कल्पना येते. दुसऱ्या आठवड्यातच १०० कोटींच्या कमाईचा आकडा पार केलेल्या ‘तनु वेडस् मनु रिटर्न’चे यशाचा घोडा धावतोच आहे. गेल्या रविवारीही ७ कोटींपेक्षा जास्त झालेल्या कमाईवरून हा चित्रपट प्रेक्षकांना किती आवडला हेच सिद्ध होते.
२०१५ मधील आतापर्यंतच्या सर्वाधिक यशस्वी चित्रपटांत ‘तनु वेडस् मनु रिटर्न’चाचा समावेश झालेला असून त्याने आतापर्यंत १२८ कोटींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट बॉक्स आॅफीसवर १५० कोटींची कमाई करील असे भाकीत व्यक्त होत आहे.
या दरम्यान प्रदर्शित झालेल्या वाशु भगनानीच्या ‘वेलकम टू कराची’ सुरुवातीपासूनच स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. दुसऱ्या आठवड्यात त्याची कमाई ८ कोटींच्या जवळपास होती व यावर्षीच्या सुपरफ्लॉप चित्रपटांच्या यादीत त्याने स्थान मिळविले आहे.
दीपिका पदुकोनचा ‘पिकू’ ७८ कोटींचा व्यवसाय करून आता काहीसा थांबला आहे. येत्या शुक्रवारी (१२) मोहित सुरीचे दिग्दर्शन
असलेला ‘हमारी अधुरी कहानी’ प्रदर्शित होतो आहे. त्यात
प्रमुख भूमिकांमध्ये इमरान हाश्मी आणि विद्या बालन आहेत. पटकथा महेश भट यांची आहे. ‘मि. एक्स’च्या अपयशानंतर इमरान हाश्मीच्या कारकिर्दीसाठी हा आगामी चित्रपट महत्वाचा समजला जात आहे. बऱ्याच कालावधीनंतर विद्या बालन चित्रपटात झळकत आहे.

टॉप ५ चित्रपट
> दिल धडकने दो- सरासरी
> वेलकम टू कराची- सुपर फ्लॉप
> तनु वेडस् मनु रिटर्न-सुपर हिट
> बाँबे वेलवेट-सुपर फ्लॉप
> पिकू-हिट

Web Title: The box office beats slow down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.