Box office: 'सालार'ची यशस्वी घोडदौड; तिसऱ्या दिवशीही पार केला ५० कोटींचा टप्पा, लवकरच गाठणार २०० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 01:25 PM2023-12-24T13:25:21+5:302023-12-24T13:26:25+5:30

Salaar: 'सालार'च्या कमाईचा परिणाम animal आणि 'डंकी'च्या कमाईवरही झाला आहे.

box-office-collection-day-3-prabhas-outshines-shah-rukh-khan-on-day-three-becomes-highest-earning | Box office: 'सालार'ची यशस्वी घोडदौड; तिसऱ्या दिवशीही पार केला ५० कोटींचा टप्पा, लवकरच गाठणार २०० कोटी

Box office: 'सालार'ची यशस्वी घोडदौड; तिसऱ्या दिवशीही पार केला ५० कोटींचा टप्पा, लवकरच गाठणार २०० कोटी

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास याचा बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ठरलेला सालार (Salaar: Part 1- Ceasefire)  हा सिनेमा अखेर रिलीज झाला. २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. इतंकच नाही तर या सिनेमाच्या रिलीजचा परिणाम रणबीर कपूरच्या animal वरही झाला. एकाच दिवसाच या सिनेमाच्या कमाईत ३० टक्क्यांची घट झाली. विशेष म्हणजे सालारने दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे.

प्रशांत नील दिग्दर्शित सालार हा सिनेमा २०२३ या वर्षातील सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. इतकंच नाही तर देशातील सर्वाधिक ओपनिंग करणाऱ्या सिनेमांच्या टॉप १० यादीत हा सिनेमा चौथ्या स्थानावर आहे. या सिनेमासोबत शाहरुख खानचा डंकी हा सिनेमा सुद्धा रिलीज झाला होता. परंतु, सालारने डंकीलाही मागे टाकलं आहे.

पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन आणि जगपति बाबू यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने आतापर्यंत भारतात १५० कोटींच्या आसपास कमाई केली आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी ९० कोटी, दुसऱ्या दिवशी ५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. इतकंच नाही तर तिसऱ्या दिवशी (रविवार) या सिनेमाने ६५ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे लवकरच हा सिनेमा तीन दिवसांमध्ये २०० कोटींचा टप्पा गाठणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, सालार हा सिनेमा दोन पार्टमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या पहिल्या पार्टचं नाव 'सालार: पार्ट1 सीजफायर' असं असून दुसऱ्या पार्टचं नाव शौर्यंगा पर्व असं असणार आहे. सालार पार्ट १ हा सिनेमा तेलुगू, हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये रिलीज झाला आहे.

Web Title: box-office-collection-day-3-prabhas-outshines-shah-rukh-khan-on-day-three-becomes-highest-earning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.