शाहिद कपूरचा जर्सी रिलीज होताच, ट्विटवर #BoycottJersey होऊ लागला ट्रेंड; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 05:23 PM2022-04-22T17:23:05+5:302022-04-22T17:24:12+5:30

शाहिद कपूर (Shahid Kapoor)चा जर्सी' (Jersey)या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमा रिलीज होताच सोशल मीडियावर बॉयकॉट जर्सी ट्रेंड करतो आहे.

Boycott jersey trended on twitter with shahid kapoor first day of film release know here the reason | शाहिद कपूरचा जर्सी रिलीज होताच, ट्विटवर #BoycottJersey होऊ लागला ट्रेंड; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

शाहिद कपूरचा जर्सी रिलीज होताच, ट्विटवर #BoycottJersey होऊ लागला ट्रेंड; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

googlenewsNext

शाहिद कपूर (Shahid Kapoor)चा जर्सी' (Jersey)या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. शाहिद कपूरशिवायमृणाल ठाकूर, पंकज कपूर, रोनित कामरा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. एकीकडे शाहिदचे चाहते चित्रपटाबद्दल खूश आहेत, तर दुसरीकडे सोशल मीडियावर बॉयकॉट जर्सी ट्रेंड करतो आहे. काही लोक अभिनेत्याच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत. ट्विटर यूजर्सच्या पोस्टनुसार, हे प्रकरण शाहिद कपूरने केलेल्या विनोदाचं आहे. जो लोकांना आवडला नव्हता. जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते.. 

बॉयकॉट जर्सी होतोय ट्रेंड 
मृणाल ठाकूर आणि शाहिद कपूर स्टारर चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे की, बॉयकॉट जर्सी हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. युजरच्या पोस्टनुसार, शाहिदने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत मस्करी केली होती. एका यूजरने लिहिले की, शाहरुख आणि शाहिदने ज्या प्रकारे सुशांतची खिल्ली उडवली होती ती आम्ही कधीही विसरू शकत नाही. सगळ्यांनी मिळून हा चित्रपट सुपर फ्लॉप बनवूया. तर इतरांनी लिहिले की, संपूर्ण बॉलिवूडने बहिष्कार टाकावा.

 

शाहरुख खान, शाहिद कपूर आणि सुशांत सिंह राजपूत आयफा अवॉर्ड्सच्या मंचावर होते. यादरम्यान अभिनेत्याने सुशांत सिंग राजपूतसोबत मस्करी केली होती जी लोकांना आवडला नाही. आता याबाबत सोशल मीडियावर शाहिदच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे.
 

Web Title: Boycott jersey trended on twitter with shahid kapoor first day of film release know here the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.