सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर ट्विटरवर ट्रेंड होतोय #BoycottKhans
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 07:35 PM2020-06-22T19:35:17+5:302020-06-22T19:35:49+5:30
सुशांतच्या आत्महत्येला सलमान खान आणि करण जोहरला जबाबदार ठरवले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून या दोघांवर टीका होत आहे एवढेच नाही तर त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसत आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांसोबतच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. 14 जूनला सुशांतने वांद्रे येथील त्याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर बरेच वाद सुरू आहे. ज्यात सुशांतच्या आत्महत्येला सलमान खान आणि करण जोहरला जबाबदार ठरवले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून या दोघांवर टीका होत आहे एवढेच नाही तर त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसत आहे. अशातच आता ट्विटरवर #BoycottKhans टॉप ट्रेंडमध्ये दिसत आहे.
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर एकीकडे शोक व्यक्त केला जात होता तर दुसरीकडे नेपोटिझमचा वाद उफाळलेला पहायला मिळाला. स्टार किड्ससोबतच करण जोहर आणि सलमान खान सारख्या प्रसिद्ध सेलिब्रेटींवर टीका केली जात आहे. अनेकांनी तर सलमान, शाहरूख आणि आमिर या तिघांनाही बॉलिवूडमधून बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. मात्र काहींनी सलमान-शाहरुख यांना पाठिंबा दिला आहे आणि यावरूनच सुशांतचे चाहते आणि सलमान-शाहरुख यांचे चाहते यांच्यात ट्विटर वॉर सुरू आहे. त्यामुळेच आता ट्विटरवर #BoycottKhans टॉप ट्रेंडमध्ये दिसत आहे.
boycott khans theek h magar bhulna mt iss boycott ko kuch dino baad#SushantSinghRajput#boycott#BoycottKhans
— Ujjwal Pathak (@pathakujjwal__) June 22, 2020
सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमुळे त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.
I am eagerly waiting for his death.
— Rishabh Singh (@Rishabh_thegr8) June 22, 2020
Are you?? #BoycottKhanspic.twitter.com/WmmNI64wVQ
सुशांतने त्याच्या करियरची सुरूवात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती.
#BoycottKhans these all fellows are useless they think that they are only famous in this bolllywood industry #JusticeForSushantSinghRajputpic.twitter.com/Fu2mnUvuwc
— Aryan Kumar Singh (@AryanKu55441156) June 22, 2020
सुशांतने त्याच्या अभिनय करिअरची सुरुवात 2009 मध्ये पवित्र रिश्ता या मालिकेतून केली होती. त्यानंतर 2013 मध्ये 'काय पो छे' या सिनेमातून त्याने बॉलिवूड पदार्पण केले.
त्यानंतर त्याने 'शुद्ध देसी रोमांस', 'एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी', 'राबता', 'केदारनाथ' और 'सोनचिरैया' या सारख्या चित्रपटात काम केले. त्याला खरी ओळख एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरीमधून मिळाली.