'बॉईज 2' फेम प्रतिक लाडचं नवं गाणं ऐकलंत का? उडत्या चालीमुळे होतंय लोकप्रिय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 17:12 IST2021-11-30T17:11:32+5:302021-11-30T17:12:39+5:30
Taporya dolyat :अलिकडेच 'टपोऱ्या डोळ्यात' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत आहे.

'बॉईज 2' फेम प्रतिक लाडचं नवं गाणं ऐकलंत का? उडत्या चालीमुळे होतंय लोकप्रिय
गेल्या काही वर्षांमध्ये संगीत क्षेत्रात कमालीचा बदल झाला आहे. प्रेक्षकांचा कल लक्षात घेता चित्रपटांमध्ये अनेकदा उडत्या चालीच्या गाण्यांचा समावेश करण्यात येत आहे. यामध्येच आता आणखी एक उडत्या चालीचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात बॉईज २ चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेला अभिनेता प्रतिक ला़ड झळकला आहे. या गाण्यात प्रतिकसोबत अभिनेत्री सोनाली दळवी स्क्रीन शेअर केली आहे.
अलिकडेच 'टपोऱ्या डोळ्यात' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. 'टपोऱ्या डोळ्यात' हे एक रोमँटिक सॉंग असून यात प्रियकर आणि प्रेयसीच्या प्रेमाचं अचूक वर्णन करण्यात आले आहे. अभिनेता प्रतिक लाड आणि अभिनेत्री सोनाली दळवी यांची लव्हेबल केमिस्ट्री या गाण्यात पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, हे गाणे पंकज दत्तू वारुंगसे यांनी लिहिले असून या गाण्याला संगीतबद्ध करण्याची धुराही त्यांनीच पार पाडली आहे. तर गायक ऋषिकेश शेलार याने हे गाणे स्वरबद्ध केले आहे.