‘बीपी’ नाटक मुलांसाठी खुले

By Admin | Published: November 27, 2014 11:28 PM2014-11-27T23:28:13+5:302014-11-27T23:28:13+5:30

‘बालक पालक’ या चित्रपटाचं सर्वत्र भरभरून स्वागत झालं. हा चित्रपट एका एकांकिकेवर आधारलेला होता. काही वर्षापूर्वी एका स्पर्धेत सादर झालेली बीपी एकांकिका खूप गाजली.

'BP' plays open to children | ‘बीपी’ नाटक मुलांसाठी खुले

‘बीपी’ नाटक मुलांसाठी खुले

googlenewsNext
‘बालक पालक’ या चित्रपटाचं सर्वत्र भरभरून स्वागत झालं. हा चित्रपट एका एकांकिकेवर आधारलेला होता. काही वर्षापूर्वी एका स्पर्धेत सादर झालेली बीपी एकांकिका खूप गाजली. मग चित्रपटही गाजला. ‘बीपी’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येत आहे. मात्र, त्याला ए (प्रौढांसाठी) असे प्रमाणपत्र मिळाल्याने ते मुलांर्पयत पोहोचणार नव्हते. मात्र, हडप यांनी परिनिरीक्षण मंडळाकडे या नाटकाचा विषय मुलांर्पयत पोहोचण्याची आवश्यकता असल्याचे सांगून ते सर्वासाठी बघण्यास खुले असावे, अशी विनंती केली होती. त्यानंतर या नाटकाला रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडून सर्वासाठी म्हणून तात्पुरते प्रमाणपत्न देण्यात आले. परिनिरीक्षण मंडळाने नाटकातील कोणताही भाग न वगळता नाटकाचे प्रयोग सगळ्यांसाठी खुले केल्याचे पत्न हडप यांना पाठवले आहे. त्याची मुदत 31 डिसेंबपर्यंत आहे. त्यामुळे आता अंबर हडप लिखित आणि गणोश पंडित दिग्दर्शित भद्रकाली प्रॉडक्शनचे बीपी हे नाटक आता 18 वर्षाखालील अल्पवयीन मुलेही पाहू शकतील.

 

Web Title: 'BP' plays open to children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.