बाबो! रणबीर आणि आलियाच्या 'ब्रम्हास्त्र'चं बजेट आउट ऑफ कंट्रोल, आकडा वाचून जाल चक्रावून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 09:30 AM2020-11-29T09:30:08+5:302020-11-29T09:31:01+5:30
मीडियासोबत बोलताना 'ब्रम्हास्त्र'च्या मेकर्सने खुलासा केला की, हा भारतात तयार झालेला सर्वात मोठा सिनेमा आहे.
दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या आगामी 'ब्रम्हास्त्र'ची जेव्हापासून घोषणा झाली तेव्हापासून या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. आता सांगितले जात आहे की, सिनेमाचं बजेट तब्बल ३०० कोटी रूपयांच्यावर गेलं आहे. या सिनेमाला आधीच सर्वात मोठा सिनेमा म्हटलं जात आहे. जर सगळं काही ठीक झालं तर पुढील वर्षी हा सिनेमा रिलीज होईल.
मीडियासोबत बोलताना 'ब्रम्हास्त्र'च्या मेकर्सने खुलासा केला की, हा भारतात तयार झालेला सर्वात मोठा सिनेमा आहे. सिनेमाच्या ३०० कोटी बजेटवर त्यांनी सांगितले की, बजेट कमी नाही पण यापेक्षा जास्तच झालं असेल. मेकर्सना असंही वाटतं की ब्रम्हास्त्र सारख्या सिनेमाचा खरा आनंद थिएटरमध्येच घेतला जाऊ शकतो.
'ब्रम्हास्त्र' सिनेमा आपल्या स्टारकास्टमुळेही चर्चेत आहे. यात रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट मौनी रॉय, डिंपल कपाडिया आणि अक्किनेनी नागार्जुन मुख्य भूमिकेत दिसतील. मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमात रणबीर कपूर सुपर हिरोची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा तीन पार्टमध्ये बनवला जाईल.
या सिनेमाची आणखी एक खासियत म्हणजे यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्क्रीनवर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. कोरोनामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे गेली होती. दिग्दर्शक अयान मुखर्जी म्हणाला होता की, हा सिनेमा प्रेक्षकांना नवा आणि अद्भुत अनुभव देईल. सोबतच हेही सांगितलं की, सिनेमात टाकल्या जात असलेल्या व्हीएफएक्समुळे सिनेमाला उशीर होत आहे.