Brahmastra Movie: 'ब्रह्मास्त्र'च्या लॉजिकवर प्रश्न उपस्थित करणाऱ्याला करण जोहरचे सडेतोड उत्तर; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 07:59 PM2022-09-18T19:59:29+5:302022-09-18T19:59:48+5:30
Brahmastra Movie: 'ब्रह्मास्त्र'चा निर्माता करण जोहरने चित्रपटाच्या लॉजिकवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या एका ट्विटर युजरला सडेतोड उत्तर दिले आहे.
Brahmastra Movie: रणबीर कपूर आणि आलिया भट स्टारर 'ब्रह्मास्त्र पार्ट वन-शिवा' (Brahmastra) बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. हा चित्रपट 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे. या चित्रपटाला यश मिळूनही प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत आहे. समीक्षक आणि चाहत्यांनी या चित्रपटाच्या कथेवर आणि काही दृश्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, चित्रपटातील एका लॉजिकवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या एका व्यक्तीला निर्माता करण जोहरने (Karan Johar) सडेतोर उत्तर दिले.
चित्रपटात एक सीन आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एका गुप्त आश्रमात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या आश्रमात 'ब्रह्ममांश' नावाची एक गुप्त संस्था राहते. नागार्जुनचे पात्र रणबीरला तिथे जाण्यासाठी मदत करते. अनेकांनी टीका केलेल्या एका सीनमध्ये अनिश शेट्टी(नागार्जुनचे पात्र) गुगल मॅपवर आश्रमाचा पत्ता शोधतोय.
या सीनच्या लॉजिकवर प्रश्न
या सीनचा संदर्भ देताना रविवारी एका ट्विटर युजरने पोस्ट केले, 'हे आश्रम गुप्त आहे, मग गुगल मॅपवर आश्रमाचा पत्ता कसा शोधतोय? यामुळेच चित्रपटाने 300 कोटींची कमाई केली आहे का? ही भारतीय क्रिएटीव्हीटी आहे का?'
करण जोहरचे सडेतोर उत्तर
हे ट्विट शेअर करत करण जोहरने उत्तर दिले की, 'यात सीनमध्ये कोणताही दोष नाही, कारण पत्ता आश्रमाचा आहे. आश्रम जगातील इतर ठिकाणांसारखेच आहे. गुरु हा खऱ्या जगात इतर व्यक्तींसारखा जगतोय. तो ब्रह्मांशचा प्रमुख आहे, हे कुणालाच माहीत नाही. त्यामुळे त्यांचा पत्ता गुगल मॅपवर आहे!'