Brahmastra : 410 कोटींच्या ‘ब्रह्मास्त्र’साठी रणबीर-आलियानं किती घेतली फी? अमिताभ यांनीही घेतलं तगडं मानधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 08:00 AM2022-09-09T08:00:00+5:302022-09-09T08:00:02+5:30
Brahmastra Star Cast Fees: ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूर लीड रोलमध्ये आहे. या चित्रपटासाठी रणबीरने बरीच मेहनत घेतली, तितकीच तगडी फी वसूल केली. अगदी आलिया भटच्या दुप्पट.
Brahmastra Star Cast Fees: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भट (Alia Bhatt) यांचा ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra ) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दीर्घकाळापासून प्रेक्षक या चित्रपटाची प्रतीक्षा करत होते. अखेर आज हा सिनेमा रिलीज झाला. आलिया व रणबीरच्या या सिनेमावर अगदी पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला. थोडाथोडका नव्हे तर तब्बल 410 कोटी रूपयांत हा चित्रपट बनून तयार झाला. या चित्रपटात एकापेक्षा एक जबरदस्त व्हीएफएक्स सीन्स आहेत आणि हे सीन्स चित्रपटाचं बजेट वाढण्याचं एक मोठं कारण आहे. केवळ व्हीएफएक्स इफेक्टवरच 50 ते 57 कोटी रूपयांचा खर्च झाला आहे. स्टारकास्टची फी सुद्धा हे बजेट वाढण्याचं दुसरं कारण आहे. या चित्रपटासाठी आलिया, रणबीर व अन्य कलाकारांनी किती फी घेतली माहितीये का?
‘ब्रह्मास्त्र’मध्येरणबीर कपूर लीड रोलमध्ये आहे. यात तो शिवाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटासाठी रणबीरने बरीच मेहनत घेतली, साहजिकच तितकीच तगडी फी सुद्धा वसूल केली. एका रिपोर्टनुसार, रणबीरने या चित्रपटासाठी 20 ते 25 कोटी रूपये मानधन घेतलं. अगदी आलिया भटच्या दुप्पट.
रणबीरच्या अपोझिट आलिया भट आहे. या चित्रपटासाठी आलियाने 10 ते 12 कोटी रूपये घेतल्याचं कळतंय. आलिया पहिल्यांदाच रणबीरसोबत काम करत आहे. याच चित्रपटाच्या सेटवर आलिया व रणबीर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. आता दोघंही पती-पत्नी आहेत. शिवाय लवकरच आईबाबाही होणार आहेत.
महानायक अमिताभ बच्चन हे या चित्रपटात गुरूच्या भूमिकेत आहेत. अमिताभ यांनी 8 ते 10 कोटींमध्ये हा सिनेमा साईन केल्याचं कळतंय. साऊथ स्टार नागार्जुन याचीही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्याने चित्रपटातील भूमिकेसाठी 9 ते 11 कोटी रुपये घेतले आहेत.
टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी मौनी रॉय यात दमदार भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मौनीने चित्रपटासाठी 3 कोटी रुपये घेतले. चित्रपटात
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनीही चित्रपटात भूमिका साकारली आहे. यासाठी त्यांनी 85 लाख मानधन घेतल्याचं सांगण्यात येतंय.
अभिनेता प्रतिक बब्बर या चित्रपटात राजा सिंहची भूमिका साकारत असून या भूमिकेसाठी त्याने 1 कोटी रुपये घेतले आहेत.