आ गया हैं भाईजान!

By Admin | Published: July 11, 2015 01:40 AM2015-07-11T01:40:19+5:302015-07-11T05:05:11+5:30

रमजान ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाचा नायक सलमान खानने ‘लोकमत’चे सह व्यवस्थापकीय व संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांच्यासह संपादकीय

Brother has come! | आ गया हैं भाईजान!

आ गया हैं भाईजान!

googlenewsNext

रमजान ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाचा नायक सलमान खानने ‘लोकमत’चे सह व्यवस्थापकीय व संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांच्यासह संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी या चित्रपटाविषयी अनेक मुद्द्यांवर मनमोकळी चर्चा केली. या चित्रपटाचा ‘लोकमत’ हा मीडिया पार्टनर आहे. तासभरापेक्षाही जास्त वेळ मेहबूब स्टुडिओमध्ये ही चर्चा चालली. त्या वेळेस सलमानने प्रत्येक प्रश्नाला आपल्या खास दबंग स्टाईलमध्ये उत्तर दिले.

‘बजरंगी भाईजान’चा अर्थ काय आहे, तो समजावून सांग.
अर्थ खूपच साधा आणि सोपा आहे, की आपण माणूस असल्यामुळे आपल्या भावनांचा आपणच आदर राखला पाहिजे. त्याबद्दल कोणतीही तडजोड करायची गरज नाही. आपल्याला जे योग्य वाटेल त्यासाठी कोणाशीही दोन हात करायची आपली तयारी हवी. मागे हटायची गरज नाही. ‘बजरंगी भाईजान’ची भूमिका हेच सांगते.


यात हिंदू-मुस्लीम ऐक्यावर जोर दिला आहे.
या सगळ्या गोष्टी चित्रपटाच्या बॅकड्रॉपला आहेत. चित्रपटाची मुख्य कथा तर बजरंगीची आहे. हा बजरंगी हनुमानभक्त असून, त्याला येथे सगळे जण बजरंगी म्हणत असतात. जेव्हा तो मुलीला तिच्या घरी सोडायला पाकिस्तानात जातो, तेव्हा तेथे सगळे त्याला भाईजान म्हणतात. जरा विचार करा, बजरंगी जर महाराष्ट्रात असता तर तो बजरंगी भाऊ व उत्तर प्रदेशात असता तर बजरंगी भय्या झाला असता. पाकिस्तानात तो जातो तेव्हा तेथे तो ‘बजरंगी भाईजान’ बनतो.


पण हे नाव आले कसे, काही विशेष कारण असेल?
चित्रपट पाहून ते समजेलच. अर्थात याबद्दल काही गूढ असे नाही. जेव्हा तो पाकिस्तानात असतो तेव्हा त्याच्या नावाने एक ट्युबचा व्हिडीओ अपलिंक होतो व या व्हिडीओला ‘बजरंगी भाईजान’ असे नाव दिले जाते. येथूनच ‘बजरंगी भाईजान’ शब्दही जोडला जातो.


याला बजरंगीच्या पाकिस्तानपर्यंत होणाऱ्या प्रवासाची कथा समजायला हरकत नाही.
हो़ तर असे म्हणता येईल़ आम्ही चित्रपटाचा आधार माणुसकी असा ठेवला आहे. याशिवाय आणखी काहीही विचार केलेला नाही. हेच चित्रपटाचे सत्य व संदेश आहे. हिंदू-मुस्लीम किंवा भारत-पाकिस्तान चित्रपटाचा भाग जरूर आहे; परंतु पाया आहे तो मानवतेचा.


तू या चित्रपटाचा निर्माता आहेस. ‘बजरंगी भाईजान’च्या कथेत तुला असे काय जाणवले की त्याची निर्मिती आपण करावी?
मी आताच सांगितले, की चित्रपटाचा आधार हा मानवता आहे व तोच माझ्या मनाला भावला. तसे तर आम्ही कोणत्याही स्वरूपाचा चित्रपट बनवू शकलो असतो. कबीरबरोबर (चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान आहेत़) जो कोणता चित्रपट तयार केला गेला असता त्यावर पैसा कमावला असता. परंतु येथे हा प्रश्न नाही. पैसे कमवायचा विचार कधीही केला नाही. कथा चांगली वाटली. ती सगळ््यांना संदेश देते, की तुम्ही चांगला विचार केला तर सगळे काही सकारात्मक राहील आणि आयुष्यही आनंदी, सुखाचे असेल. माझ्यासाठी या चित्रपटाचा अर्थ हाच आहे, की चित्रपट बघून लोक जेव्हा बाहेर पडतील तेव्हा त्यांना ‘अरे, चित्रपटाने काय छान संदेश’ दिला अशी प्रतिक्रिया व्यक्त करावी वाटली पाहिजे. आमचा संदेश रसिकांच्या मनाला भिडल्यास आमचा उद्देश सफल झाल्याचे वाटेल.


‘वॉण्टेड’पासून ‘किक’पर्यंतच्या चित्रपटांप्रमाणे यामध्ये कोणते लोकप्रिय संवाद आहेत?
आम्ही ठरवून असं काहीही करीत नाही. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी असं काहीही वाटत नाही. परंतु चित्रपट झळकल्यानंतर आपापल्या पसंतीनुसार रसिकांच्या तोंडी संवाद रुळतात. या चित्रपटातही रसिकांना आवडतील, असे बरेच धडाकेबाज संवाद (डायलॉग) आहेत. अर्थात निर्णय रसिकजनांना घ्यायचा आहे. एखादा तरी संवाद लोकांच्या पसंतीला उतरेल, असा ठाम विश्वास वाटतो.


- देशभरातील अनेक भागांत चित्रपटाला कोणत्या कोणत्या कारणांवरून विरोध केला जात आहे? कोणी टायटलवरून नाराज आहे, तर काही जण चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करीत आहेत.
मी यावर काय बोलणाऱ़़ कोणी असाही विचार करू शकतो? हे सर्व प्रकार बघून खेद वाटतो. आमची वैचारिक पातळी एवढी खालावली, की लोकांच्या भावना दुखणारे चित्रपट बनवावेत. असे चित्रपट बनविण्याची गरजच नाही. मी अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत काम करीत आहे. आमच्या मनात असा कोणताही विचार डोकावत नाही. टायटलच्या
बाबतीत म्हणाल तर तेथूनच मानवतेचा संदेश प्रतीत होत असतो. कोणाला टायटल पसंत पडले नाही, तर आम्हाला खेद वाटणे स्वाभाविक आहे. परंतु आम्ही ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट बनवित आहोत हे सर्वांनाच ठाऊक होते. मीडियात याची जोरदार चर्चा होती, तेव्हा मौन का बाळगले? नाराजी होती, तर आधीच स्पष्ट बोलायला हवे होते. आता चित्रपट प्रदर्शित होण्याच्या बेतात असताना निरर्थक चर्चा कशासाठी. या चित्रपटातील जे काही चांगले आहे, ते चित्रपट पाहणाऱ्यांनाही आवडेल. गरज आहे ती सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याची.

-----------
काश्मीरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याबद्दल...
काश्मीरमध्ये मी सर्वांशी बोललो. आम्ही चित्रपट बघतो, कुटुंबासोबत चित्रपट पाहतो, असे प्रत्येकाने सांगितले. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. मग चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्यात काय अडचण आहे ?
चित्रपटगृहे सुरू राहिली तर किती रोजगार उपलब्ध होऊ शकतो; मात्र असे का घडत नाही, हे मला कळत नाही. माझ्या समजुतीप्रमाणे तेथे सुरक्षेचा मुद्याही गंभीर आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही. जर चित्रपटगृहे सुरू झाली व काही घडले तर अडचण होऊ शकते. हा मुद्दाही समजून घ्यायला लागतो. तरीही मला वाटते की, ज्या प्रकारे तेथे दैनंदिन जीवन चालते, इतर कामे सुरळीत होतात, तर मग चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्याबाबतही गांभीर्याने विचार व्हायला हवा.

चित्रपट आणि ईदचे समीकरण...
यात योग्य, अयोग्य असे काही नाही. मूळ मुद्दा म्हणजे आजही प्रेक्षक प्रचंड संख्येने आहेत, मात्र आमच्याकडे जास्त चित्रपटगृहे नाहीत. मला वाटते की आणखी चित्रपटगृहे असायला हवीत. त्यामुळे सर्व चित्रपटांना चित्रपटगृहे उपलब्ध होतील. चित्रपटगृह मिळावे म्हणून सध्या सर्वांना नोंदणी करावी लागते. जर चित्रपटगृहे वाढली तर समस्या राहणार नाही. सर्वांचे चित्रपट येतील व चालतील.

मी ऐकणारा माणूस
मला ऐकायला आवडते... मी जास्त बोलत नाही. दिवसभर बडबड करत असलो की मी घरी जाऊन गप्प बसतो. जास्त बोललो की दमतो. मी जे बोलतो ते खरंच बोलतो, पण ते चुकीचे वाटते. तसं पाहिले तर खरं सगळ््यांनाच माहीत असतं. तसं बोललं जात नाही़ सत्य हे मृदू करून बोलले जाते. आणि जर मी खोटे बोललो तर त्याचा कोणी ना कोणी गैरफायदा घेईल.

व्हाय डोंट यू कम क्लीन
सोशल मीडिया हे खरे तर व्यक्त होण्यासाठी चांगले माध्यम आहे. मी सुद्धा टष्ट्वीटर फेसबुक वापरतो. त्यावर मनातील विचार व्यक्त करतो. आज सोशल मीडियावर खोटी अकाउंटस बनवून निंदा केली जाते. जर तुम्हाला काही बोलायचे असेल तर स्पष्ट शब्दांमध्ये आपल्या खऱ्याखुऱ्या प्रोफाईलमधून बोलण्यास काय हरकत आहे?

Web Title: Brother has come!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.