Amitabh Bachchan यांच्या फॅमिली फोटोत दिसणाऱ्या अजब पेंटिंगची चर्चा; किंमत ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 09:35 PM2021-11-07T21:35:39+5:302021-11-07T21:37:54+5:30

Amitabh Bachchan Diwali Celebration : यावर्षी बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या खास शैलीत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी दिवाळीतील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. माहितीये का आहे ते पेटिंग इतकं खास?

bull painting in amitabh bachchans viral diwali photo heres how much it costs | Amitabh Bachchan यांच्या फॅमिली फोटोत दिसणाऱ्या अजब पेंटिंगची चर्चा; किंमत ऐकून व्हाल हैराण

Amitabh Bachchan यांच्या फॅमिली फोटोत दिसणाऱ्या अजब पेंटिंगची चर्चा; किंमत ऐकून व्हाल हैराण

googlenewsNext

अनेक अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी आपण दिवाळी हा सण कसा साजरा केला हे फोटोज शेअर करत सांगितलं. बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांनीदेखील आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांनीदेखील आपल्या कुटुंबीयांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर (Social Media)  शेअर केला. त्यांच्या या फोटोला अनेक लाईक्सही मिळाले. परंतु त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये एक पेटिंग (Painting) दिसत आहे. या पेटिंगबाबत आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहे. अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांनी हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, श्वेता बच्चन, अगस्त्य नंदा आणि नव्या नंदा दिसत आहेत. त्यांच्या मागे भिंतीवर एक मोठं पेटिंगही दिसत आहे. यामध्ये एक विशाल बैल दिसून येत आहे. हे पेटिंग पाहायला तर अजब वाटतंय. पण तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर बैलाचा पुढचा पाय आणि त्याची शेपूट ही एकत्र जोडल्याचं दिसत आहे. यामुळे सर्वांचं लक्ष या पेटिंगकडे जात आहे.

 
सोशल मीडियावर युझर्स पेटिंगबाबत अनेक प्रकारचे कमेंट्स करत आहे. एका युझरनं हे पेटिंग वेलकमच्या मजनू भाई यांनी तयार केल्याचं म्हटलं. परंतु हे पेटिंग कोणी तयार केलं आहे हे माहित आहे का ? हे पेटिंग मंजीत बावा (Manjeet Bawa) नावाच्या पेंटरनं साकारलं आहे. मंजीत यांचा जन्म १९४१ मध्ये पंजाबच्या धुरीमध्ये झाला होता. भारतीय पौराणिक कथा आणि सुफी दर्शनातून प्रेरणा घेत ते चित्र काढत होते. ते अनेकदा आपल्या पेटिंग्समधून जनावरं आणि माणसाच्या नात्याबाबत भाष्य करत होते. अमिताभ बच्चन यांच्या घरी हे पेटिंग लावण्यात आलं आहे, त्यावरून हे पेटिंगदेखील खास असणार याची कल्पना येणारच. या पेटिंगची किंमत ३ ते ४ कोटी रूपये इतकी असू शकते. याची किंमत पाहून तुम्ही नक्की हैराण झाला असाल.

Web Title: bull painting in amitabh bachchans viral diwali photo heres how much it costs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.