रिलीजच्या ३ दिवसांनंतर केबल ऑपरेटरने टीव्हीवर दाखवला हा सुपरहिट सिनेमा, पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 12:25 PM2020-01-15T12:25:55+5:302020-01-15T12:27:14+5:30

एका केबल ऑपरेटरला चित्रपट रिलीज होऊन तीन दिवसच उलटलेले असताना टीव्हीवर प्रसारीत केल्यामुळे अटक करण्यात आली आहे.

A Cable TV Owner Arrested After Telecast Rajinikanth Film Darbar Pirated Version | रिलीजच्या ३ दिवसांनंतर केबल ऑपरेटरने टीव्हीवर दाखवला हा सुपरहिट सिनेमा, पोलिसांनी केली अटक

रिलीजच्या ३ दिवसांनंतर केबल ऑपरेटरने टीव्हीवर दाखवला हा सुपरहिट सिनेमा, पोलिसांनी केली अटक

googlenewsNext

एका केबल ऑपरेटरला चित्रपट रिलीज होऊन तीन दिवसच उलटलेले असताना टीव्हीवर प्रसारीत केल्यामुळे अटक करण्यात आली आहे. केबल ऑपरेटरवर आरोप आहे की त्याने दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या दरबार चित्रपटाचे पायरेटेड व्हर्जन टीव्हीवर प्रसारीत केले आहे आणि हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हे प्रकरण तमीळनाडूमधील मदुराई शहरातील आहे. 

इंग्रजी वेबसाईट टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार १० जानेवारीला प्रदर्शित झालेला रजनीकांतचा चित्रपट दरबारचा पायरेटेटेड व्हर्जन टीव्हीवर प्रसारीत केला आहे. त्यानंतर दरबारची प्रोडक्शन कंपनी लायका प्रोडक्शन्सने केबल ऑपरेटरच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सक्त कारवाई करत केबल ऑपरेटरला अटक केली आहे. विशेष बाब म्हणजे रजनीकांतचा चित्रपट दरबार चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यावर लगेच ऑनलाईन लीक झाला होता.


चित्रपट लीक झाल्यावर दरबारच्या निर्मात्यांची चिंता वाढली. सूत्रांच्या माहितीनुसार, लायका प्रोडक्शन्सने दरबार चित्रपटावर खूप पैसे खर्च केले आहेत. हा चित्रपट जगभरात ७०००हून अधिक स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला आहे.

दरबार चित्रपटात रजनीकांत व्यतिरिक्त नयनतारा, निवेता थॉमस, योगी बाबू, प्रतीक बब्बर व सुनील शेट्टी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन ए.आर.मुरूगादॉसने केले आहे.

Web Title: A Cable TV Owner Arrested After Telecast Rajinikanth Film Darbar Pirated Version

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.