कॅमेरामन ते दिग्दर्शक... अनोखा प्रवास
By Admin | Published: October 25, 2015 03:05 AM2015-10-25T03:05:42+5:302015-10-25T03:05:42+5:30
कॅमेरामॅनपासून सुरुवात करून दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही नाव कमाविणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे. या गोष्टीचे स्मरण होण्याचे कारण प्रसिद्ध कॅमेरामॅन विनोद प्रधान आहेत.
कॅमेरामॅनपासून सुरुवात करून दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही नाव कमाविणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे. या गोष्टीचे स्मरण होण्याचे कारण प्रसिद्ध कॅमेरामॅन विनोद प्रधान आहेत. त्यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाय ठेवले आहे. कॅमेरामॅन म्हणून विनोद प्रधान यांच्या खात्यात देवदास, रंग दे बसंती आणि मुन्नाभाई एमबीबीएससह अनेक मोठ्या चित्रपटांचे नाव आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांना प्रथम अपयशाचा सामना करावा लागला. वेडिंग पुलाव बॉक्स आॅफिसवर यश मिळविण्यात पूर्णपणे अपयशी ठरला. विनोद प्रधान यांच्यापूर्वी बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कॅमेरामॅन यांनी दिग्दर्शनाच्या मैदानात नशीब आजमावले आहे. यामध्ये गोविंद निहलानी यांचे नाव सर्वात पुढे आहे. दिग्गज कॅमेरामॅन राहिलेले व्ही.के. मूर्ती यांचे सहायक असलेले गोविंद निहलानी यांनी श्याम बेनेगल यांच्या सर्व चित्रपटांसाठी कॅमेरा संभाळला. गोविंद निहलानी यांनीच रिचर्ड एटनबरो यांच्या आॅस्कर विजेता चित्रपट गांधी चित्रपटासाठी कॅमेरा सांभाळला होता. नंतर गोविंद निहलानी ओमपुरी व नसीरुद्दीन शाह यांना घेऊन आक्रोश चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
कॅमेरा सांभाळत दिग्दर्शनात आलेल्या दुसऱ्या दिग्गजांमध्ये मनमोहन सिंह यांचेही नाव आहे. यशराजच्या चांदनी आणि लम्हेसह अनेक चित्रपटांसाठी कॅमेरामनची भूमिका वठविणारे मनमोहन सिंह यांनादेखील बिनोद प्रधान यांच्याप्रकारेच अपयशाचा सामना करावा लागला. दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट पहला पहला प्यार बॉक्स आॅफिसवर चालला नाही, मात्र पंजाबी चित्रपटांच्या दिग्दर्शनात मनमोहन सिंह यांना मोठे यश मिळाले. २००७ मध्ये माधुरी दीक्षितच्या आजा नचलेपासून प्रसिद्ध कॅमेरामॅन अनिल मेहता यांनी दिग्दर्शनात पाऊल ठेवले. संजय लीला भंसाळी यांच्या सोबत खामोशी आणि हम दिल दे चुके सनम व्यतिरिक्त आमिर खानच्या लगान आणि करण जौहर यांच्या कभी अलविदा न कहना चित्रपटाचे कॅमेरामॅन राहिलेले अनिल मेहता यांना दिग्दर्शक म्ह़णून यश मिळाले नाही. म्हणून मग त्यांनी पुन्हा कॅमेरा हाती घेतला. अनिल मेहता यांनी आता दिग्दर्शनात पुरनागमानाच्या शक्यतेबाबत स्पष्टपणे नकार दिला आहे.
- anuj.alankar@lokmat.com