Cannes 2019 : कान्समध्ये दिसला ऐश्वर्या रायचा मर्मेड लूक, ज्वेलरी होती खास!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 10:18 AM2019-05-20T10:18:51+5:302019-05-20T10:19:43+5:30

2002 पासून दरवर्षी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये आपल्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांची वाह वाह लुटणारी ऐश्वर्या राय बच्चन यंदाही कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली.

Cannes 2019: aishwarya rai bachchan at cannes red carpet | Cannes 2019 : कान्समध्ये दिसला ऐश्वर्या रायचा मर्मेड लूक, ज्वेलरी होती खास!!

Cannes 2019 : कान्समध्ये दिसला ऐश्वर्या रायचा मर्मेड लूक, ज्वेलरी होती खास!!

googlenewsNext
ठळक मुद्देऐश्वर्या 2002 साली सर्वात प्रथम कान्समध्ये सहभागी झाली होती. तेव्हापासून ऐश्वर्या सतत कान्समध्ये सहभागी झाली आहे.

2002 पासून दरवर्षी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये आपल्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांची वाह वाह लुटणारी ऐश्वर्या राय बच्चन यंदाही कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली. एखादी गोल्डन मर्मेड रेड कार्पेटवर अवतरावी, अशा थाटात ऐश्वर्याने कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. तिचा गोल्डन गाऊन यावेळी सर्वांत लक्षवेधी ठरला. याशिवाय तिच्या ज्वेलरीनेही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
ऐश्वर्याने यावेळी इंटरनॅशनल डिझाईनर Jean-Louis Sabaji ने डिझाईन केलेला गाऊन कॅरी केला होता. या मेटॅलिक गोल्डन यॅलो गाऊनला वन आॅफ शोल्डनने बोल्ड लूक दिला गेला होता.

गाऊनमध्ये लॉन्ग्र ट्रेल अटॅच केलेली होती. एकंदर ऐश्वर्याचा हा लूक मर्मेडसारखा होता. यॅलो आयशॅडो, लाईनर, न्यूड लिपस्टिक आणि सिंपल हेअरस्टाईलने तिने या लूकला पूर्ण केले होते.

चेहऱ्यावर आणि कानांवरही यॅलो हाईलाइटर, यॅलो नेलपेंटसोबत ऐश्वर्याने बोटांत एक युनिक रिंग घातलेली होती. ऐश्वर्याचा यंदाचा कान्समधील लूक हा तिच्या मागील वर्षीच्या लूकशी खूपच मिळता-जुळता होता. मागील वर्षी देखील ऐश्वर्या ही निळ्या रंगाच्या मर्मेड ड्रेसमध्ये दिसून आली होती. त्यावेळी देखील तिने मीड पार्टिंगने आपले  केस मोकळे सोडले होते. 


विशेष म्हणजे, यावेळी तिच्यासोबत तिची मुलगी आराध्यही सोबत होती.ऐश्वर्यासोबत अनेक कार्यक्रमात आराध्यासोबतच असते. यंदा मात्र, ऐश्वर्याने आपल्या लेकीला आपल्यासोबत रेड कार्पेटवर घेऊन गेली.  यावेळी आराध्या  लेमन कलरच्या ड्रेसमध्ये दिसून आली.


ऐश्वर्या 2002 साली सर्वात प्रथम कान्समध्ये सहभागी झाली होती. तेव्हापासून ऐश्वर्या सतत कान्समध्ये सहभागी झाली आहे. दरम्यान, 2016 साली कान्समधील ऐश्वर्याच्या लूकची सर्वात जास्त चर्चा झाली होती. त्यावेळी ऐश्वर्याच्या पर्पल रंगाच्या लिपस्टिकची खूपच चर्चा रंगली होती. त्यावेळी तिला सोशल मीडियावर अनेकांनी ट्रोल देखील केले होते.

Web Title: Cannes 2019: aishwarya rai bachchan at cannes red carpet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.