Cannes 2019: कान्समध्ये कंगना राणौतची धूम! गोल्डन कलरच्या साडीत घेतली रॉयल एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 10:08 AM2019-05-17T10:08:30+5:302019-05-17T10:09:05+5:30

कान्स फिल्म फेस्टिवल 2019च्या रेड कार्पेटवर अनेकींनी एकापेक्षा एक ग्लॅरस वेस्टर्न आऊटफिटसमध्ये एन्ट्री घेतली असताना कंगनाने मात्र या खास इंटरनॅशनल इव्हेंटसाठी इंडियन लूकची निवड केली.

Cannes 2019: Kangana Ranaut gives Kanjeevaram saree a fierce twist in France | Cannes 2019: कान्समध्ये कंगना राणौतची धूम! गोल्डन कलरच्या साडीत घेतली रॉयल एन्ट्री!

Cannes 2019: कान्समध्ये कंगना राणौतची धूम! गोल्डन कलरच्या साडीत घेतली रॉयल एन्ट्री!

googlenewsNext
ठळक मुद्दे कंगना सध्या मेंटल है क्या आणि पंगा या दोन चित्रपटांत बिझी आहे. याशिवाय जलललितांच्या बायोपिकमध्येही ती दिसणार आहे.

पॅरीसमध्ये सुरु असलेल्या कान्स फिल्म फेस्टिवल 2019 साठी बॉलिवूड ललना सज्ज आहेत. बॉलिवूड क्वीन कंगना राणौत ही सुद्धा या ललनांचा टक्कर देताना दिसली. कान्स फिल्म फेस्टिवल 2019च्या रेड कार्पेटवर अनेकींनी एकापेक्षा एक ग्लॅरस वेस्टर्न आऊटफिटसमध्ये एन्ट्री घेतली असताना कंगनाने मात्र या खास इंटरनॅशनल इव्हेंटसाठी इंडियन लूकची निवड केली.


कान्स फिल्म फेस्टिवल 2019 मध्ये कंगना गोल्डन कलरच्या साडीत दिसली. कंगनाने कान्स लूकसाठी डिझाईनर फाल्गुनी आणि शेन पिकॉक यांच्या कस्टर कॉरसेटची निवड केली. याशिवाय माधुर्य क्रिएशन्सने डिझाईन केलेल्या कांजीवरम साडीत तिने कान्स फिल्म फेस्टिवल 2019च्या रेड कार्पेटवर धमाकेदार एन्ट्री घेतली.

अर्थात आपल्या या लूकला वेस्टर्न टच देणे ती विसरली नाही. यासाठी तिने पर्पल कलरचे ग्लव्स कॅरी केलेत. या गोल्डन कांजीवरम साडीसोबत कंगनाची स्टाईलिश हेअर स्टाईलही खास होती. केवळ इतकेच नाही तर यासोबत कंगनाने काळा चष्माही कॅरी केला होता.


कंगनाने आपल्या कान्स लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कान्स स्ट्रीटवरच्या एका ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटोत कंगनासोबत तिची बहीण रंगोली ही सुद्धा दिसतेय.


कंगनाने एक व्हिडीओही शेअर केला आहे. हा व्हिडीओ कान्स फिल्म फेस्टिवल 2019च्या तयारीचा आहे. यादरम्यान कंगना मीडियासमोर एकापेक्षा एक भारी पोजमध्ये दिसली. सेल्फी मागणाऱ्या चाहत्यांनाही तिने निराश केले नाही.

लोकांना या इंटरनॅशनल इव्हेंटमधील कंगनाचा लूक इतका आवडला की, सोशल मीडियावर अनेकांनी तिच्या या लूकची प्रशंसा केली. एकंदर काय तर बॉलिवूडच्या या क्वीनने आपल्या रॉयल लूकने अनेकांची मने जिंकली.
कंगना सध्या मेंटल है क्या आणि पंगा या दोन चित्रपटांत बिझी आहे. याशिवाय जलललितांच्या बायोपिकमध्येही ती दिसणार आहे.

Web Title: Cannes 2019: Kangana Ranaut gives Kanjeevaram saree a fierce twist in France

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.