Cannes 2019 : कंगना रानौतचा प्रिन्सेस लूक तर दीपिका पादुकोणचा ग्रीन आऊटफिट, दीपिकांच्या फोटोंवर रणवीरच्या प्रेमाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 01:30 PM2019-05-18T13:30:35+5:302019-05-18T13:31:51+5:30
कान्स फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडची कंगना रानौत व दीपिका पादुकोणने आपल्या लूक व अदांनी सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले होते.
कान्स फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडची कंगना रानौत व दीपिका पादुकोणने आपल्या लूक व अदांनी सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले होते. या दोघींनी सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी बॉलिवूडची क्वीन कंगना रानौत गोल्डन साडी आणि पर्पल गल्व्समध्ये रेड कार्पेटवर झळकली होती. तिच्या या लूकची सगळीकडे चर्चा झाली होती.
त्यानंतर कंगनाने फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी मायकल सिन्कोच्या गाऊनची निवड केली.
यात ती प्रिन्सेस सारखी दिसत होती. या ड्रेसवरील तिची हेअरस्टाईलदेखील पाहण्यासारखी होती.
दुसऱ्या दिवशी दीपिका पादुकोणने पाच लूकमध्ये पहायला मिळाली.त्यातील दुसऱ्या दिवशी लाईम ग्रीन डेस परिधान केला होता जो युनिक होता.
या गेटअपमध्ये तिने न्यूड मेकअप केला होता. तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.
कान्स फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी दीपिकाने अप व्हाईट रंगाचा गाऊन परिधान केला होता.
त्यावर काळ्या रंगाचा बो होता आणि हाई पोनीटेल खूप चांगला होता.
तिच्या फोटोंवर रणवीर सिंगने कमेंट करत किलिंग म्हटले आहे.
तर कंगना रानौत पहिल्या दिवशी इंडियन आणि वेस्टर्न कॉम्बिनेशनमध्ये दिसली. यात कंगना खूपच अप्रतिम दिसत होती. तसेच नुकताच तिने व्हाईट रंगाच्या गाऊनमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
या व्हाईट रंगाच्या गाऊनसोबत तिने डोळ्यांना निळ्या रंगाचे लावलेले आयलायनर जास्त खुलून दिसते आहे.