Cannes Film Festival 2022:  कान्स सोहळ्यातील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लुक व्हायरल, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 11:40 AM2022-05-17T11:40:34+5:302022-05-17T11:45:37+5:30

Cannes Film Festival 2022 : यंदाचा कान्स सोहळा भारतासाठी अनेकार्थानं महत्त्वपूर्ण आहे. कारण बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) 75 व्या कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये ज्यूरीच्या स्वरुपात भारताला प्रेझेंट करणार आहे.

Cannes Film Festival 2022 deepika Padukone's First Official Appearance As A Jury Member At Cannes | Cannes Film Festival 2022:  कान्स सोहळ्यातील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लुक व्हायरल, पाहा फोटो

Cannes Film Festival 2022:  कान्स सोहळ्यातील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लुक व्हायरल, पाहा फोटो

googlenewsNext

Cannes Film Festival 2022:  आज 17 मे पासून 28 मे पर्यंत कान्स चित्रपट महोत्सव रंगणार आहे. जगभरातील लोक कान्स फिल्म फेस्टिवलची प्रतीक्षा करत असतात. या फेस्टिवलमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणं हे सन्मानाचं समजलं जातं. यंदाचा कान्स सोहळा भारतासाठी अनेकार्थानं महत्त्वपूर्ण आहे. कारण बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यावेळी कान्स ज्युरीचा भाग  असणार आहे. या सोहळ्यात भारत  ‘कंट्री ऑफ ऑनर’ म्हणून सहभागी होणार आहे. ऐश्वर्या रॉयसह अनेक बॉलिवूड ललना या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवणार आहेत. तूर्तास दीपिकाचा कान्समधील फर्स्ट लुक (Deepika Padukone Cannest look) समोर आला आहे.

ग्रँड हयात कान्स हॉटेल मार्टिनेझ येथे ज्युरी सदस्यांसोबत डिनरसाठी गेली असता, दीपिका फारच सुंदर दिसत होती. 
 या डिनरसाठी दीपिकाने लुई व्हिटॉनच्या फॉल 2021 कलेक्शनमधील सिक्विन ड्रेसची निवड केली होती. या ड्रेससोबत ब्राऊन कलरचे हाय बुट्स, मोकळे केस असा तिचा लुक होता.  

तिच्यासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलचे दिग्दर्शक थियरी फ्रॅमॉक्स, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, ज्युरी सदस्य जेफ निकोल्स, ब्रिटिश अभिनेत्री रेबेका हॉल, आणि इतर ज्युरी सदस्यही दिसले.

दीपिकाचा कान्समधील फर्स्ट लुक पाहून चाहते बेभान झाले आहेत. तिचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
 कान्स इव्हेंटमध्ये जाण्यापूर्वी दीपिकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या सोहळ्यासाठी ती किती उत्सुक आहे, हे तिनं सांगितलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

  व्हिडीओच्या सुरुवातीला  फ्रान्सचे रस्ते, सिग्नल्स असं सगळं दिसतं. यानंतर ती तिच्या फ्लाइटबद्दल बोलते. ‘ हा 11 तासांचा प्रवास होता आणि यात ती पूर्णवेळ झोपली होती,’ असं ती म्हणते. यानंतर ती विमानतळावरून बाहेर पडताना दिसते. व्हिडीओमध्ये तिने पांढरा टी-शर्ट आणि जॅकेटसह ब्लू डेनिम जीन्स परिधान केली आहे.

Web Title: Cannes Film Festival 2022 deepika Padukone's First Official Appearance As A Jury Member At Cannes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.