रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार, सीबीआयने लावला सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 01:22 PM2020-09-04T13:22:40+5:302020-09-04T13:39:36+5:30
सुशांतच्या वडिलांनी पाटणामध्ये रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल केली आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सर्व एजन्सी जोमाने काम करीत आहेत. शुक्रवारी (4 सप्टेंबर) एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाच्या धाड टाकली आहे. यादरम्यान एनसीबीच्या टीमने शौविकला चौकशीसाठीसोबत नेलं आहे. तर दुसरीकडे सीबीआय रिया चक्रवर्तीला लवकरच अटक करण्याची शक्यता आहे.
रियाला होऊ शकते अटक
सुशांतच्या वडिलांनी पाटणामध्ये रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल केली आहे. यात त्यांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. E 24 च्या रिपोर्टनुसार आयपीसी कलम 306 (आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे) अतंगर्तच रिया चक्रवर्तीला अटक करण्यात येऊ शकते. सीबीआयच्या आतापर्यंतच्या तपासात रियाच्या आयुष्यात आल्यापासून सुशांतची तब्येत बिघडू लागली असल्याचे उघड झाले आहे. सीबीआयने सुशांतशी संबंधित असलेल्या अनेक लोकांचे जबाब नोंदविली असून यात तो खूप आनंदित व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. रिया आणि शौविकचे ड्रग कनेक्शनही तपासात उघड झाले आहे. या दोघांचे व्हॉट्सअॅप चॅट सीबीआयसमोर आले आहे. या चॅटमधून हे स्पष्ट झाले आहे की रिया आणि शौविकच्या माध्यमातून ड्रग सुशांतपर्यंत पोहोचायचे.
सुशांत - रिया टेरेसवर जाऊन स्मोक करायचे
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सीबीआयला दिलेल्या जबाबात श्रुतीने सांगितले की, रिया आणि सुशांत दोघेही गांजा एकत्र घेत असत. सुशांत आणि रिया बर्याचदा गांजा ओढण्यासाठी टेरेसवर जायचे. रिपोर्टनुसार रिया आपला भाऊ शौवित आणि सॅम्युअल मिरांडसोबत सुद्धा स्मोक करायची. श्रुती मोदी असेही म्हणाले की, ड्रग्स सुशांतच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग होता आणि तो याच्या आधीन गेला होता. श्रुती म्हणाली की रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि त्याचा कर्मचारी ड्रग्जमध्ये गुंतले होते. तिला या सर्व गोष्टींचा भाग बनण्यास जबरदस्ती केली जायची.