ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा;निधनाबद्दल दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केलीय...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 11:46 AM2020-04-30T11:46:19+5:302020-04-30T11:47:06+5:30
बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले. बुधवारी रात्री त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी काळी 9 वाजून 32 मिनिटांनी ट्विट करुन ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी दिली.
अमिताभ ट्विट करुन म्हणाले - 'तो गेलाय... ऋषी कपूर गेलाय... मी उद्धवस्त झालोय!'
It seems like we’re in the midst of a nightmare...just heard the depressing news of #RishiKapoor ji passing away, it’s heartbreaking. He was a legend, a great co-star and a good friend of the family. My thoughts and prayers with his family 🙏🏻
— Akshay Kumar (@akshaykumar) April 30, 2020
तर अक्षय कुमारने वाहताना ट्विटरवर लिहिले की, असे वाटतंय खूप वाईट स्वप्न पाहिले आहे. ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमीने खूप दुखी झालोय.ही सर्वात विदारक आणि दुःखद बातमी आहे... एक अविश्वसनीय प्रतिभा... एक उत्तम कलाकार आणि आमच्या कुटुंबासह त्यांचे खूप स्नेहपूर्ण संबंध होते. माझ्या सद्भावना त्याचे कुटुंब, मित्र परिवार आणि चाहत्यांबरोबर आहेत.
तर प्रियंका चोप्राने ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांचा फोटो शेअर करत म्हटले की, या बातमीने मन खूप सुन्न झाले आहे.
तर रजनीकांतने म्हटले की, मन हेलावून टाकणारी बातमी, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो !
Couldn’t even finish writing an obituary of our IRRFAN (RIP friend) and the news of RISHI KAPOOR ji passing away has completely crushed me!! No...this is not happening...it’s too much to https://t.co/4xV3Fqw304 RISHIJI 🙏
— manoj bajpayee (@BajpayeeManoj) April 30, 2020