‘बंदूक्या’ सिनेमासाठी सेन्सॉरकडून सकारात्मक दृष्टिकोन!

By Admin | Published: July 5, 2017 05:49 AM2017-07-05T05:49:35+5:302017-07-05T05:49:35+5:30

बंदूक्या...’ या राज्य शासनाने यावर्षी विविध पुरस्कारांनी गौरविलेल्या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा होत आहे. या सिनेमाविषयी मराठी तसेच इतर

Censor positive attitude for 'gun shot'! | ‘बंदूक्या’ सिनेमासाठी सेन्सॉरकडून सकारात्मक दृष्टिकोन!

‘बंदूक्या’ सिनेमासाठी सेन्सॉरकडून सकारात्मक दृष्टिकोन!

googlenewsNext

‘बंदूक्या...’ या राज्य शासनाने यावर्षी विविध पुरस्कारांनी गौरविलेल्या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा होत आहे. या सिनेमाविषयी मराठी तसेच इतर भाषिक प्रेक्षकांनाही रिलीजची उत्सुकता लागलेली आहे. ‘काय गं डंगरे, कशाला नाचतीस?....तुझ्या आईच्या वरातीत नाचती’ अशी तुफान डायलॉगबाजी असलेला ‘बंदूक्या’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजेंद्र बोरसे आणि प्रतिभा बोरसे यांच्या वर्षा सिनेव्हिजनची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन राहुल मनोहर चौधरी यांनी केले आहे. समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या हृदय हेलावणाऱ्या रूढी परंपरेची झलक या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाबाबत अधिक माहिती देताना सिनेमाचे दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी म्हणाले, ‘बंदूक्या’ सिनेमातील पात्रांच्या भाषेतच शिव्या हा अविभाज्य घटक असल्याचे हे दिग्दर्शक, लेखक यांनी सेन्सॉर बोर्डला पटवून दिले. त्यामुळे या चित्रपटातील आशय तितक्याच ताकदीने पोहोचविण्यासाठी सेन्सॉर बोर्डानेही सकारात्मक भूमिका घेत विविध महोत्सवात गाजणाऱ्या या महत्त्वपूर्ण सिनेमाला प्रथमत:च मान्यता दिलेली आहे. नुकत्याच झालेल्या ५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘बंदूक्या’ सिनेमाने ६ नामांकने आणि ४ राज्य पुरस्कार पटकावले आहेत. सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट, सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार पदार्पण या पुरस्कारांमुळे या सिनेमाची उंची नक्कीच उंचावली आहे. अभिनेत्री अतिशा नाईक, अभिनेता शशांक शेंडे, नामदेव मुरकुटे, नीलेश बोरसे, अमोल बागुल, तन्मयी चव्हाणके, उन्नती शिखरे यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाची भाषाच निखळ मनोरंजन करणारी असल्याने प्रेक्षकांना याचा अनुभव नक्की घ्यायला आवडेल. अस्सल गावरान शिव्या या विशिष्ट बोलीभाषेचा एक अविभाज्य आणि संरक्षक घटक असल्याने ‘बंदूक्या’ हा वेगळ्या धाटणीचा, तसेच मनोरंजनाच्या नेहमीच्या चौकटी बाहेरचा सिनेमा प्रेक्षकांची वाहवा मिळवेल यात शंका नाही. ‘बंदूक्या’ हा सिनेमा १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.

Web Title: Censor positive attitude for 'gun shot'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.