'व्हॅलेंटाईन डे'निमित्ताने कुशल बद्रिकेची खास पोस्ट, बायकोचा फोटो शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 01:06 PM2024-02-14T13:06:14+5:302024-02-14T13:09:36+5:30

'चला हवा येऊ द्या' फेम कुशल बद्रिकेने आपल्या पत्नीसाठी'व्हॅलेंटाईन डे'निमित्ताने खास पोस्ट केली.

Chala Hava Yevu Dya Fame Kushal Badrike Shares Special Post On Valentine Day for his wife | 'व्हॅलेंटाईन डे'निमित्ताने कुशल बद्रिकेची खास पोस्ट, बायकोचा फोटो शेअर करत म्हणाला...

'व्हॅलेंटाईन डे'निमित्ताने कुशल बद्रिकेची खास पोस्ट, बायकोचा फोटो शेअर करत म्हणाला...

फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना म्हणतात. या महिन्यात लोक आपल्या क्रश, पार्टनर किंवा जवळच्या व्यक्तींसमोर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आतुर असतात. तसं पाहिलं तर हा आठवडा या जोडप्यासाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. जगभरात प्रेमाचा दिवस म्हणून  १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. आज 'व्हॅलेंटाईन डे'निमित्ताने विनोदवीर कुशल बद्रिकेनं खास पोस्ट शेअर केली आहे. 

कुशल अनेकदा पत्नीबरोबरचे फोटो शेअर करत तिच्यावरचं प्रेम व्यक्त करत असतो. आज व्हेलेंटाइन डेनिमित्ताने त्यानं बायकोसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. कुशलनं इन्स्टाग्रामवर बायकोचा फोटो पोस्ट केला आणि कॅप्शमध्ये लिहलं, तुमच्या सोबत झालंय का कधी असं? की एखादं माणूस आपल्या समोर येतं आणि जगात फक्त आपलंच घड्याळ slow motion मध्ये धावायला लागतं. Newton ने लावलेला गुरुत्वाकर्षणाचा शोध फाट्यावर मारून आपण तरंगूच लागतो एकदम'.

 

'जत्रेतल्या चष्मेवाल्याकडचा “गुलाबी गॉगल” चढवल्या सारखं फक्त आपलंच जग “गुलाबी” होऊन जातं आणि “जत्रेतला पाळणा” अजूनही slow motion मध्ये धावत आपल्या घड्याळात अडकून पडलेला असतो, बास बास तुमचा व्यवहारी जगाशी संबंध संपला, राजाहो तुम्ही प्रेमात आहात, आता slow, motion मधलं “जत्रेतलं घड्याळ” आणि तुमच्या “मनगटावरचा पाळणा” normal ला आणायची चावी समोरच्या माणसाकडे आहे. देव तुमचं भलं करो :- सुकून'. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. 

कुशल आणि सुनयनाने २००९ साली लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्यांचं लव्ह मॅरेज आहेत. कुशल आणि सुनयनाला दोन मुलं आहेत. सुनयना एक कथ्थक डान्सर आहे. तिनं कथ्थकचं पदवीधर शिक्षण घेतलं आहे. कथ्थकमध्ये विशारद आणि अलंकार अशी पदवी तिनं संपादन केली आहे. कुशल बद्रिकेच्या अभिनयाच्या प्रवासात कुटुंबाबरोबरच त्याच्या पत्नीचा म्हणजेच सुनयनाचा देखील महत्त्वाचा वाटा आहे. अभिनेत्याचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास सोपा नव्हता, या संपूर्ण प्रवासात त्याला त्याच्या बायकोची खंबीर साथ मिळाली आहे. 

Web Title: Chala Hava Yevu Dya Fame Kushal Badrike Shares Special Post On Valentine Day for his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.