गुजराती कुटुंबाची सून आहे मराठमोळी श्रेया,अशी आहे विनोदाच्या राणीची LOVE STORY

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 08:00 AM2020-06-27T08:00:00+5:302020-06-27T08:00:02+5:30

27 डिसेंबर 2015 रोजी निखिल आणि श्रेया विवाहबद्ध झाले. श्रेयाचे माहेर आणि सासर दोन्हीही पुण्यात आहे. श्रेया आणि निखिल यांचे लव्ह मॅरेज आहे.

Chala Hawa Yeu Dya Fame Actress Shreya Bugade Wedding Album | गुजराती कुटुंबाची सून आहे मराठमोळी श्रेया,अशी आहे विनोदाच्या राणीची LOVE STORY

गुजराती कुटुंबाची सून आहे मराठमोळी श्रेया,अशी आहे विनोदाच्या राणीची LOVE STORY

googlenewsNext

'चला हवा येऊ द्या' या शोमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे सेठ गुजराती कुटुंबाची सून आहे. श्रेयाचे लग्न निखिल सेठसोबत झाले आहे. 27 डिसेंबर 2015 रोजी निखिल आणि श्रेया विवाहबद्ध झाले. श्रेयाचे माहेर आणि सासर दोन्हीही पुण्यात आहे.


श्रेया आणि निखिल यांचे लव्ह मॅरेज आहे. एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली होती. एका मुलाखतीत श्रेयाने तिच्या लव्ह स्टोरीविषयी सांगितले होते. या दोघांची रिअर लाइफ लव्हस्टोरी सिनेमापेक्षा कमी नाहीए. श्रेयाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ती निखिलसोबत अनेक फोटो शेअर करत असते.

श्रेयाने सांगितल्यानुसार, शूटिंग सेटवर निखिल तिच्याशी सतत मैत्री करण्याचा प्रयत्न करत असे. काही कारणावरुन दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर निखिलने त्या मालिकेतून काढता पाय घेतला होता. या मालिकेनंतर अनेक महिने दोघांची भेट झाली नव्हती. काही महिन्यांनी निखिल एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असेलली 'गुंतता हृदय' ही मालिका छोट्या पडद्यावर सुरु झाली. मालिकेच्या क्रेडिटमध्ये निखिलचे नाव बघून श्रेयाने त्याला फोन केला आणि मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या. 

या फोन कॉलनंतर हळूहळू दोघांमध्ये संवाद सुरु झाला. त्याकाळात निखिलचे घरचे त्याच्या लग्नासाठी मुली शोधत होते. एकेदिवशी निखिलने श्रेया तू सिंगल आहेस का? असा प्रश्न विचारला. त्यावर श्रेयाने हो उत्तर दिल्यानंतर निखिलने तिला लग्नाची मागणी घातली आणि घरच्यांच्या सहमतीने दोघांचे लग्न झाले. निखिलचे हे लव्ह एट फर्स्ट साइट होते.

Web Title: Chala Hawa Yeu Dya Fame Actress Shreya Bugade Wedding Album

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.