'चला हवा येऊ द्या - होऊ दे व्हायरल'चा विजेता ठरणार रविवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 02:00 PM2019-03-02T14:00:07+5:302019-03-02T14:09:36+5:30

 आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला.

Chala Hawa Yeu Dya hou de vairal winner will announce on sunday | 'चला हवा येऊ द्या - होऊ दे व्हायरल'चा विजेता ठरणार रविवारी

'चला हवा येऊ द्या - होऊ दे व्हायरल'चा विजेता ठरणार रविवारी

googlenewsNext
ठळक मुद्दे६ स्पर्धक महाअंतिम सोहळ्यात प्रेक्षकांच्या समोर त्यांची कला सादर करणार आहेत

 आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमात नावीन्य म्हणून चला हवा येऊ द्या चे पर्व होउ दे व्हायरल प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वात तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आणि त्यात सर्व स्पर्धक यशस्वी ठरले.

या स्पर्धकांच्या विनोदांनी संपूर्ण महाराष्ट्र हसला तर कधी कधी या हास्यसम्राटांनी त्यांच्या परफॉर्मन्समधून समाज प्रबोधन देखील केलं. महाराष्ट्राताच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या २६ स्पर्धकांमधून आता फक्त ६ स्पर्धक महाअंतिम सोहळ्यात प्रेक्षकांच्या समोर त्यांची कला सादर करणार आहेत. स्नेहल शीदम, अर्णव काळकुंद्री, नितीन कुलकर्णी, प्रवीण तिखे, डॉ. पूजा सदमतेला, गौरवी वैद्य या टॉप सहा स्पर्धकांपेकी प्रेक्षक त्यांच्या आवडीच्या स्पर्धकांना विजयी करणार आहेत. पाहता पाहता या स्पर्धेचा अंतिम सोहळा जवळ येऊन ठेपला आहे. रविवार ३ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. या महाअंतिम सोहळ्यासाठी  आदेश बांदेकर, रवी जाधव, श्वेता शिंदे, अशोक शिंदे हे कलाकार देखील या मंचावर सज्ज होणार आहे. हा मला अंतिमसोहळा म्हणजे विनोदासोबत नाच गाणं आणि धमाल असणार आहे. तेव्हा या महाअंतिम सोहळ्यात कोण विजयी होणार हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका 'चला हवा येऊ द्या - होऊ दे व्हायरल'चा महाअंतिम सोहळा रविवारी संध्याकाळी ७वाजता फक्त झी मराठीवर.
 

Web Title: Chala Hawa Yeu Dya hou de vairal winner will announce on sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.