बाजीराव-मस्तानी मधील भूमिका आव्हानात्मक - रणवीर सिंग
By Admin | Published: December 9, 2015 09:40 PM2015-12-09T21:40:26+5:302015-12-09T21:40:26+5:30
बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील गेल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत बाजीराव-मस्तानीमध्ये साकारलेली बाजीरावची भूमिका माझ्यासाठी एकप्रकारे आव्हान देणारीच होती, असे अभिनेता रणवीर सिंगने
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील गेल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत बाजीराव-मस्तानीमध्ये साकारलेली बाजीरावची भूमिका माझ्यासाठी एकप्रकारे आव्हान देणारीच होती, असे अभिनेता रणवीर सिंगने एका दैनिकाच्या वेबपोर्टलवर म्हटले आहे.
बाजीराव-मस्तानी हा चित्रपट माझ्या करिअरमधील सर्वात कठीण टप्पा असून यासाठी जास्तीत वेळ एक वर्षांपेक्षा जास्त वेळ मी दिला आहे. या चित्रपटाचे काम सुरु असताना दुस-या कोणत्याही चित्रपटांसाठी मी कोणतेही काम केले नाही. अशा वेळेत तुम्ही तीन चित्रपटांसाठी काम करु शकता, मात्र माझ्यासाठी बाजीराव-मस्तानी चित्रपटात काम करणे म्हणजे एकप्रकारची मोठी जोखीम होती. मी ज्यावेळी चित्रपटातील मराठा योद्धा बाजीराव पेशवे यांची भूमिका करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी मला अनेकांनी शुभेच्छा दिला. तर, अनेकांनी विचारणा केली की तू खरच हा चित्रपटत करत आहेस का आणि मग त्यांनी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आणि ते समजून गेले की मी या चित्रपटासाठी काम करत आहे, असे रणवीर सिंहने सांगितले. गुंडे या चित्रपटासाठी मी गॅंगस्टरची भूमिका केली होती. आता मराठा योद्धा बाजीराव पेशवे यांची भूमिका साकारत असून त्याच दुनियेत वावरत असल्याचेही रणवीर सिंह म्हणाला.