ऑनलाइन कार्यक्रमात अंतरा, मल्हार सोबत संवाद साधण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 10:58 AM2021-10-07T10:58:27+5:302021-10-07T11:05:41+5:30
लोकमत सखी मंच आणि कलर्स मराठी प्रस्तुत स्पर्धा. मालिकेतील संगीत दिग्दर्शक, गायिकांना भेटण्याची संधी
औरंगाबाद : स्त्री सबलीकरण, महिला सक्षमीकरणअंतर्गत लोकमत सखी मंच आणि कलर्समराठी प्रस्तुत ‘जीव माझा गुंतला, तुमच्या यशाची कहाणी’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचा ऑनलाइन सोहळा ५ आक्टोबर रोजी सखींना घर बसल्या मोबाइलवर पाहता येणार आहे.
कलर्समराठी वाहिनीवर ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. ही कहाणी आहे ‘अंतरा’ या महिलेची जी रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीतेने पार पाडते आहे.
ही कहाणी एका ‘अंतरा’ची असली तरी समाजात अशा असंख्य अंतरा आहेत. त्यांनी केलेला आयुष्यातील संघर्ष सर्वांसमोर यावा त्यातून अनेकांना प्रेरणा मिळावी. या उद्देशाने ‘जीव माझा गुंतला, तुमच्या यशाची कहाणी’ ही स्पर्धा घेण्यात येत आहे.
जीवनात ‘अंतरा’सारखा संघर्षमय प्रवास केला असेल तर तुम्ही या स्पर्धेत सहभागी होऊ शकता. आलेल्या जीवनगाथेतून निवडक ५ महिलांना आकर्षक बक्षिसे तसेच निवडक विजेत्यांना ‘जीव माझा गुंतला’च्या कलाकारांसोबत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी आपण आपली कथा व प्रिय व्यक्तीसोबतचा तुमचा फोटो ४ आक्टोबरपर्यंत ९८५०४०६०१७ या मोबाइल नंबरवर व्हॉटस्ॲप करा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ऑनलाइनद्वारे अंतरा, मल्हार साधणार सखींशी संवाद
लोकमत सखी मंच व कलर्स मराठी प्रस्तुत ‘जीव माझा गुंतला- तुमच्या यशाची कहाणी’ हा ऑनलाइन कार्यक्रम ५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. यात ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतील कलाकार अंतरा व मल्हार हे सर्वांशी संवाद साधणार आहेत. अंतराचे लग्न झाले. आता ती पुढे काय करणार, ती संसार सांभाळत रिक्षा चालविणार का? चाहत्यांच्या मनातील प्रश्नाला ती यावेळी उत्तर देणार आहे.
मालिकेतील संगीत दिग्दर्शक, गायिकांना भेटण्याची संधी
- ‘जीव माझा रंगला’ या मालिकेतील संगीत दिग्दर्शक व ज्यांनी या मालिकेचे टायटल साँग कम्पोज केले ते नीलेश मोहरीर, सुप्रसिद्ध गायिका शमिका भिडे हिने गायिले आहे. धनश्री कोरगावकर हे या कार्यक्रमात सर्वांशी संवाद साधाणार आहेत.
- उल्लेखनीय म्हणजे ऑनलाइन कार्यक्रमातच जळगावचे चित्रकार निरंजन शेलार हे कलाकारांचे लाईव्ह चित्र काढणार आहेत. या कार्यक्रमात सूत्रसंचालन अभिनेत्री सिद्धी पाटणे ही करणार आहे.