याला म्हणतात 'रजनी'ची क्रेझ! 'जेलर' पाहण्यासाठी ऑफिसने दिली कर्मचाऱ्यांना सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 01:43 PM2023-08-07T13:43:38+5:302023-08-07T13:46:00+5:30
Jailer:चेन्नई आणि बंगळुरू येथील काही ऑफिसमध्ये १० ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) याचा 'जेलर' (Jailer) हा सिनेमा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत येत आहे. येत्या १० ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होणार आहे. त्यामुळे या सिनेमाची संपूर्ण टीम जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. यात अलिकडेच या सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर आणि प्रोमो समोर आला. ज्यामुळे रजनीकांतच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यामध्येच आता या सिनेमाविषयी एक माहिती समोर येत आहे. हा सिनेमा पाहता यावा यासाठी काही शहरांमध्ये चक्क कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून सुट्टी मिळाली आहे.
रिलीजच्या दिवशी कर्मचाऱ्यांना मिळणार सुट्टी
सूत्रांच्या माहितीनुसार, चेन्नई आणि बंगळुरू येथील काही ऑफिसमध्ये १० ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. हा सिनेमा सगळ्यांना पाहता यावा यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर न्यूयॉर्कमध्ये सुद्धा या सिनेमाचं एडव्हान्स बुकिंग सुरु झालं आहे. त्यामुळे विदेशामध्ये या सिनेमाने प्रदर्शिनापूर्वीच १० कोटींचा गल्ला जमा केल्याचं म्हटलं जात आहे.
Offices started announcing holiday for #Jailer release 😎🥳
— Achilles (@Searching4ligh1) August 4, 2023
The #SuperstarRajinikanth phenomenon and the only actor in the world who can bring the country to standstill🥳❤️😍#Rajinikanth#Thalaivar170#JailerFromAug10#JailerAudioLaunch#JailerShowcase#Kaavaalaa#Thalaivarpic.twitter.com/BMLztdAiRO
नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित या सिनेमामध्ये रजनीकांत एका पोलिस अधिकाऱ्याच्या वडिलांच्या भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा तामिळसह हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात रजनीकांतसोबत जॅकी श्रॉफ आणि तमन्ना भाटियासुद्धा स्क्रीन शेअर करणार आहे.