'जावळीच्या जंगलाचा राजा एकच..., सह्याद्रीचा वाघ 'छत्रपती शिवाजी महाराज!; 'शेर शिवराज'चं नवीन पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 01:11 PM2022-03-28T13:11:16+5:302022-03-28T13:11:50+5:30

Sher Shivraj Movie: फझलखान वधाचा चित्तथरारक अनुभव 'शेर शिवराज' या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj is the only king of Jawali forest ... New poster of 'Sher Shivraj' released | 'जावळीच्या जंगलाचा राजा एकच..., सह्याद्रीचा वाघ 'छत्रपती शिवाजी महाराज!; 'शेर शिवराज'चं नवीन पोस्टर रिलीज

'जावळीच्या जंगलाचा राजा एकच..., सह्याद्रीचा वाघ 'छत्रपती शिवाजी महाराज!; 'शेर शिवराज'चं नवीन पोस्टर रिलीज

googlenewsNext

 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' आणि 'पावनखिंड' या चित्रपटानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा आगामी चित्रपट 'शेर शिवराज' (Sher Shivraj)ची घोषणा झाल्यापासून सर्वजण उत्सुकतेने चित्रपटाची वाट पाहत आहेत. अफझलखान वधाचा चित्तथरारक अनुभव 'शेर शिवराज' या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. 

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शेर शिवराज चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर रिलीज केले आहे आणि लिहिले की, जावळीच्या जंगलाचा राजा एकच...
तो म्हणजे, सह्याद्रीचा वाघ 'छत्रपती शिवाजी महाराज'!. शेर शिवराजच्या नव्या पोस्टरवर अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत आणि ते झुडुपातून कोणाला तरी पाहत असल्याचे भासते आहे. या पोस्टरला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे.

दिग्पाल लांजेकर यांच्या 'शेर शिवराज' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला? हे पाहायला मिळणार आहे. प्रतापगड आणि अफझलखान यांचा खूप जवळचा संबंध आहे. राजांना जेरबंद करण्याच्या उद्देशानं भला मोठा फौजफाटा घेऊन सर्व तयारीनिशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला खरा, पण पुन्हा माघारी जाऊ शकला नाही. तिथेच त्याची कबर खोदली गेली. कारण खानाला शिवरायांच्या युद्धनीतीची, बुद्धीचातुर्याची, गनिमी काव्याची यासोबतच संयम, शिष्टाई आणि चतुराई या गुणांची जराही कल्पना नव्हती. शिवरायांच्या याच अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन 'शेर शिवराज' या चित्रपटात घडणार आहे.

यासोबतच त्या काळातील सामाजिक, राजकीय वातावरण, राजांच्या अचूक निर्णयांचा रयतेला होणारा फायदा, शत्रूंची आक्रमणं परतवून लावण्याची शक्ती, अफझलखानाची स्वारी, खानाचा वध करत विजापूरी साम्राज्याला राजांनी लावलेला सुरुंग आणि त्यामुळं हादरलेल्या आदिलशाहीचं यथोचित चित्रण 'शेर शिवराज' मध्ये दिग्पालने केले आहे. 

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj is the only king of Jawali forest ... New poster of 'Sher Shivraj' released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.