छाया कदमांनी मराठी भाषेतच गाजवला कान्स, म्हणाल्या - 'मी तिथल्या लोकांना मातृभाषेतच...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 01:23 PM2024-06-04T13:23:53+5:302024-06-04T13:25:03+5:30

मराठमोळी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) हे नाव सध्या खूपच चर्चेत आहे.

Chhaya Kadam On Talking In Marathi not english During Cannes Film Festival 2024 | छाया कदमांनी मराठी भाषेतच गाजवला कान्स, म्हणाल्या - 'मी तिथल्या लोकांना मातृभाषेतच...'

छाया कदमांनी मराठी भाषेतच गाजवला कान्स, म्हणाल्या - 'मी तिथल्या लोकांना मातृभाषेतच...'

मराठमोळी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) हे नाव सध्या खूपच चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित Cannes Film Festival मध्ये छाया कदम यांनी रेड कार्पेटवर हजेरी लावली. नाकात नथ, हटके साडी असा लूक करत त्यांनी आपली संस्कृती सातासमुद्रापार पोहोचवली. छाया कदम यांनी  इंग्रजी भाषा बोलता न येण्याचा न्यूनगंड अजिबात न बाळगता कान्स गाजवला. इंग्रजी नाहीतर मराठी भाषेतच कान्समध्ये छाया कदम यांनी संवाद साधला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं आहे.

 इंग्रजी भाषा न बोलता आल्याने अनेक मराठी माणसांच्या मनात न्यूनगंड तयार झालेला आपण पाहतो. मात्र छाया कदम या गोष्टीला अपवाद ठरल्या. नुकतेच छाया कदम यांनी its.majja ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी उत्तम इंग्रजी भाषा येत नसल्याचं सांगितलं. छाया कदम म्हणाल्या, 'मला आधीपासूनच इंग्रजीची भीती होती. पण आता मला असं वाटतं की, मला नाही येत इंग्रजी भाषा बोलता तर ठीक आहे. मला किती छान इंग्रजी बोलता येतं यासाठी नाहीतर माझ्या कामासाठी व माझ्या चित्रपटासाठी इथं बोलावलं आहे. मला माझं काम इथपर्यंत घेऊन आलं आहे'.

पुढे त्या म्हणाल्या,  'तरीही मी तिथे जाऊन तोडकं मोडकं इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करायचे. पण ते लोकंही फ्रेंच भाषा बोलतात. तर त्यांनाही इंग्रजी बोलता येत नव्हतं. तर मी त्यांना गंमतीने यू डोन्ट नो इंग्लिश (तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही) असं म्हणायचे. मला आता या कान्स फेस्टिव्हलनंतर आत्मविश्वास आला आहे. माज नाही म्हणता येणार पण स्वत:बद्दल आत्मविश्वास वाटत आहे. मला इंग्रजी भाषा नाही बोलता येत संपला विषय. तुम्हाला समजून घ्यायचे आहे तर तुम्ही समजून घ्या'. केवळ आपल्या अभिनयाच्या हिंमतीवर छाया कदमने हॉलिवूडमध्ये आपली मराठी पताका फडकावली.

छाया कदम यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही कलाविश्वात नाव कमावलं आहे. त्यांनी 'सैराट','फँड्री' आणि 'न्यूड'सारख्या सिनेमांमध्ये काम केलं. तर नुकतंच त्यांच्या 'मडगाव एक्सप्रेस' आणि 'लापता लेडीज' या हिंदी सिनेमातील भूमिका गाजल्या. कान्समध्ये त्यांच्या All we imagine as light सिनेमाला ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळाला.  छाया यांच्या पुढच्या सिनेमाची चाहते आता आतुरतेने वाट पाहत आहेत.
 

Web Title: Chhaya Kadam On Talking In Marathi not english During Cannes Film Festival 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.