...म्हणून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले अक्षय कुमारचे फॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2017 07:00 PM2017-04-04T19:00:54+5:302017-04-04T19:02:00+5:30
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे चाहते झाले आहेत.
>ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 4 - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे चाहते झाले आहेत. अक्षय कुमारने केलेल्या कामावर ते भलतेच खूष आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारच्या "हागणदारी मुक्त"(ओडीएफ) या कार्यक्रमाला समर्थन दिल्याबद्दल अक्षयचं चौहान यांनी कौतूक केलं आहे. "टॉयलेट: एक प्रेम कथा" हा अक्षयचा आगामी सिनेमा आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षयने मध्य प्रदेशच्या खरगौन येथे एक शौचालय बांधण्यासाठी हातभार लावला.
सोमवारी (दि.3) चौहान यांनी अक्षय कुमारसोबतचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या हागणदारी मुक्त(ओडीएफ) या कार्यक्रमाला समर्थन दिल्याने अक्षय कुमार कौतुकास पात्र आहे. अक्षयमुळे स्वच्छ भारत मिशनसाठी तरूणांना प्रेरणा मिळेल असं ट्विट त्यांनी केलं.
Appreciate @akshaykumar ji"s support to #ODF program of Centre & MP Govt. His contribution will inspire the youth for #SwatchBharatMission. pic.twitter.com/MdNFtnx1l1— ShivrajSingh Chouhan (@ChouhanShivraj) April 3, 2017
त्यावर अक्षय कुमारनेही शिवराज सिंग चौहान यांना रिट्विट करत त्यांचे आभार मानले. अक्षय कुमारचा आगामी सिनेमा टॉयलेट: एक प्रेम कथा हा पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानावर आधारित आहे. 11 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून अक्षयसोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर या सिनेमात दिसणार आहे.
Thank you Sir, for your kind words and commendable efforts towards the mission