Video: नागार्जुनने केलेली चूक चिंरजीवीकडून घडली! सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला दिला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 12:32 PM2024-08-01T12:32:04+5:302024-08-01T12:32:26+5:30

सुपरस्टार चिरंजीवीचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यामुळे लोकांना संताप अनावर झालाय (cheeranjivi)

chiranjeevi pushed fan who try to take selfie with actor shocking video viral | Video: नागार्जुनने केलेली चूक चिंरजीवीकडून घडली! सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला दिला धक्का

Video: नागार्जुनने केलेली चूक चिंरजीवीकडून घडली! सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला दिला धक्का

काही दिवसांपूर्वी सुपरस्टार नागार्जुनने एअरपोर्टवर सेल्फी घ्यायला आलेल्या एका दिव्यांग फॅनला धक्का मारल्याने तो चाहता पडता पडता वाचला. त्यामुळे नागार्जुनवर खूप टीका झाली. पुढे नागार्जुनने एअरपोर्टवर परतीच्या प्रवासात त्या चाहत्याची भेट घेऊन त्याची माफीही मागितली. आता अशीच काहीशी गोष्ट सुपरस्टार चिरंजीवीच्या बाबतीत घडलीय. सेल्फी घ्यायला आलेल्या एका चाहत्याला चिरंजीवीने जोरात बाजूला सारलंय. हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. 

चिंरजीवीने चाहत्याला जोरात ढकललं अन्...

सुपरस्टार चिरंजीवीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात तो पत्नी सुरेखासोबत एअरपोर्टवरील लिफ्टमधून बाहेर पडत वेगाने चालताना दिसतो. त्यावेळी इंडिगो एअरलाईन्सचा कर्मचारी चिरंजीवीजवळ जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. तो चिरंजीवीच्या वाटेत येतो. तोच चिरंजीवी काहीश्या संतापात त्या चाहत्याला बाजूला ढकलतो आणि निघून जातो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चिरंजीवीवर लोक भडकले आहेत.

काहींनी केला सपोर्ट तर काहींनी काढला राग

चिरंजीवीचा हा व्हिडीओ व्हायरल होताच काहींनी त्याला सपोर्ट केलाय. तर काहींनी चिरंजीवीवर राग व्यक्त केलाय. 'एखादा कलाकार गडबडीत असताना त्याच्या वाटेत आडवं येऊन फोटोसाठी प्रयत्न करणं चुकीचं आहे', असं काही फॅन्स म्हणत आहेत. तर काहींनी 'चिंरजीवीने स्वतःवर ताबा ठेऊन अशी कृती करायला नको होती', असं म्हटलंय. जशी नागार्जुनने दिलगिरी व्यक्त केली तशी चिरंजीवी व्यक्त करणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे. 

Web Title: chiranjeevi pushed fan who try to take selfie with actor shocking video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.