'स्वत:ला सुपरस्टार समजतोस का?'; संपूर्ण सेटवर चिरंजीवीचा झाला होता मोठा अपमान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 10:09 AM2024-04-05T10:09:25+5:302024-04-05T10:10:11+5:30

Chiranjeevi: हैद्राबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात चिरंजीवीने त्याच्या झालेल्या अपमानाविषयी भाष्य केलं.

chiranjeevi-reveals-he-was-yelled-at-a-film-set-was-humiliated-in-front-of-everyone-know-what-happened | 'स्वत:ला सुपरस्टार समजतोस का?'; संपूर्ण सेटवर चिरंजीवीचा झाला होता मोठा अपमान

'स्वत:ला सुपरस्टार समजतोस का?'; संपूर्ण सेटवर चिरंजीवीचा झाला होता मोठा अपमान

दाक्षिणात्य कलाविश्वातील नावाजलेला अभिनेता म्हणजे चिरंजीवी (chiranjeevi).  उत्तम अभिनय आणि संवादफेक कौशल्य यामुळे चिरंजीवने साऊथ इंडस्ट्रीवर राज्य केलं आहे. इतकंच नाही तर बॉलिवूडकरांवरही त्याची भूरळ आहे. प्रचंड नाव, प्रसिद्ध कमवूनही चिरंजीवीने त्याचा साधेपणा जपला आहे. विशेष म्हणजे आज त्याचं नाव सगळे आदराने घेतात. परंतु, एकदा संपूर्ण सेटसमोर एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने त्याचा अपमान केला होता. एका मुलाखतीमध्ये त्याने याविषयी भाष्य केलं आहे.

'कोईमोई'च्या रिपोर्टनुसार, तेलुगू डिजिटल मीडिया फेडरेशनने (DMF) अलिकडेच हैद्राबादमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात चिरंजीवीने हजेरी लावली होती. यावेळी त्याने आणि अभिनेता विजय देवरकोंडा याने त्यांच्या फिल्मी प्रवासाविषयी भाष्य केलं. तसंच चिरंजीवीला सगळ्यांसमोर कसा अपमान सहन करावा लागला होता हे सुद्धा त्याने सांगितलं.

"जगय्या, सारदा यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबतच मी सेटवर अनेक ज्युनिअर कलाकारांसोबत काम करत होतो. त्याचवेळी एका सेटवर दिग्दर्शक आले आणि माझ्या अंगावर जोरात खेकसले. तू स्वत:ला सुपरस्टार समजतोस काय? हे ऐकून मला एकदम अपमान झाल्यासारखं वाटलं. माझ्यासोबत सगळ्यांसमोर असं वागणं त्यावेळी मला योग्य वाटलं नाही. पण, हाच तो दिवस होता जेव्हा मी ठरवलं की एक दिवस नक्कीच सुपरस्टार होऊन दाखवेन. हा अपमान मी सकारात्मकतेने घेतला आणि त्या दृष्टीने करिअरवर फोकस केलं. पण, इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी किती मेहनत घेतलीये हे माझं मलाच ठावूक", असं चिरंजीवी म्हणाला.

दरम्यान, एका मित्रामुळे चिरंजीवी यांना पुनाधिरल्लू या सिनेमात रोल मिळाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या अॅक्टिंगच्या करिअरची सुरुवात झाली. चिरंजीवी लवकरच Vishwambhara या सिनेमात झळकणार आहेत. हा सिनेमा २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. यापूर्वी ते २०२३ मध्ये वॉल्टेअर वीराय्या आणि भोला शंकर या सिनेमात अखेरचे झळकले होते.

Web Title: chiranjeevi-reveals-he-was-yelled-at-a-film-set-was-humiliated-in-front-of-everyone-know-what-happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.