'चोली के पिछे'च्या मूळ गायिका नवीन गाण्यावर भडकल्या! निर्मात्यांकडे केली मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 11:52 AM2024-03-28T11:52:12+5:302024-03-28T11:56:08+5:30

करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनन यांच्यावर चित्रीत झालेल्या 'चोली के पिछे क्या है' गाण्याच्या नवीन व्हर्जनवर मूळ गायिका ईला अरुण यांनी नाराजी व्यक्त केलीय. याशिवाय म्यूझिक कंपनीकडे मोठी मागणी केलीय

Choli Ke Peeche original singer ila arun angry on new song in crew movie | 'चोली के पिछे'च्या मूळ गायिका नवीन गाण्यावर भडकल्या! निर्मात्यांकडे केली मोठी मागणी

'चोली के पिछे'च्या मूळ गायिका नवीन गाण्यावर भडकल्या! निर्मात्यांकडे केली मोठी मागणी

करीना कपूर, तब्बू, क्रिती सेनन यांच्या Crew सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. उद्या २९ मार्चला सिनेमा रिलीज होतोय. Crew मधील 'चोली के पिछे क्या है' गाणं सध्या चांगलंच ट्रेंडिंगमध्ये आहे. नवीन अंदाजात हे गाणं प्रेक्षकांसमोर आलं आहे. पण 'चोली के पिछे क्या है' च्या मूळ गायिका इला अरुण यांनी मात्र या गाण्याबद्दल नाराजी दर्शवली आहे. इतकंच नव्हे, तर म्यूझिक कंपनी आणि निर्मात्यांकडे मोठी मागणी केलीय.

'चोली के पिछे क्या है' हे मूळ गाणं इला अरुण आणि अलका याज्ञिक यांनी गायलं आहे. खलनायक सिनेमातील माधुरी दीक्षितवर चित्रित झालेलं हे गाणं आजही लोकप्रिय आहे. नवीन गाण्यात इला आणि अलका यांच्या आवाजाची ओळ ठेवली असून दिलजीत दोसांझ आणि आयपी सिंग यांनीही आवाज दिलाय. ईला याबद्दल म्हणाल्या, "या गाण्याबद्दल मला लॉन्चच्या अवघ्या 5 मिनिटं आधी सांगण्यात आलं. मात्र म्युझिक कंपनीशी माझं चांगलं बॉन्डिंग आहे. मला आधी सांगितलं असतं तरी मी कोणताही नकार दिला नसता. पण असं करणं नैतिकदृष्ट्या चुकीचं असून मला मोठा धक्का बसला आहे."

इला अरुण पुढे म्हणाल्या, "हे गाणे लॉन्च होण्याच्या ५ मिनिटे आधी मला फोन आला आणि आशीर्वाद मागितले. मला या गाण्याबाबत कोणताही वाद निर्माण करायचा नाही पण अनुभव चांगला नव्हता. कोणत्याही कलाकाराचं गाणं रिक्रिएट होत असेल तर त्याची माहिती त्याला दिलीच पाहिजे. असं होत असेल तर मूळ कलाकारांनाही गाण्यातील नफ्याचा काही हिस्सा मिळायला हवा."

Web Title: Choli Ke Peeche original singer ila arun angry on new song in crew movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.